Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तुकाराम मुंढे यांची बदली रद्द करण्याची मागणी; सावली दिव्यांग संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

शेवगाव : राज्याच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांची करण्यात आलेली बदली तात्काळ रद्द करावी, अशी मागणी सावली दिव्यांग संघटनेच्

दुर्गादेवी नय्यर विद्यालयात गुणगौरव सोहळा उत्साहात; मंथन व स्टुडंट टॅलेंट सर्च परीक्षेत विद्यार्थ्यांची नेत्रदीपक कामगिरी
मौत कल आती है, आज आ जाए.. डरता कौन है! प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेशानंतर आ. रोहित पवारांची भावनिक प्रतिक्रिया
महिलांनी प्रशिक्षणातून व्यवसाय उभा करावा; शालिनी विखे पाटील ; जनसेवा फाउंडेशन अंतर्गत महिलांना प्रशिक्षण

शेवगाव : राज्याच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांची करण्यात आलेली बदली तात्काळ रद्द करावी, अशी मागणी सावली दिव्यांग संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, तुकाराम मुंढे यांनी दिव्यांग सक्षमीकरण विभागाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अल्पावधीतच दिव्यांग व्यक्तींच्या हितासाठी अनेक महत्त्वपूर्ण व ठोस निर्णय घेतले. विशेषतः बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे सरकारी नोकरी व पदोन्नती मिळविणाऱ्या व्यक्तींविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी शासन निर्णय घेतला. त्यानुसार सर्व प्रशासकीय विभागांतील दिव्यांग कर्मचाऱ्यांची सक्तीने पडताळणी करणे बंधनकारक करण्यात आले.

या पडताळणी मोहिमेमुळे राज्यभरात आतापर्यंत सुमारे चारशेपेक्षा अधिक बोगस दिव्यांग कर्मचारी आढळून आले असून, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सदर प्रक्रिया अद्याप सुरू असून, मुंढे यांच्या बदलीमुळे या मोहिमेला खीळ बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

तुकाराम मुंढे हे राज्यातील दिव्यांग बांधवांसाठी ‘डॅशिंग अधिकारी’ व न्याय देणारे आधारस्तंभ म्हणून कार्यरत होते. अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली करणे हे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मनोबलावर आघात करणारे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

राज्यातील लाखो दिव्यांग व्यक्तींचे हित जपण्यासाठी तसेच प्रशासनातील पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी तुकाराम मुंढे यांची बदली तात्काळ रद्द करून त्यांना दिव्यांग कल्याण विभागातच कार्य करण्याची संधी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी सावली दिव्यांग संघटनेचे बाबासाहेब महापुरे, चांद शेख, बाहुबली वायकर, संभाजी गुठे, संदीप चेडे, समाधान कदम, बाबासाहेब गडाख, मल्हारी शेवाळे, महादेव काटे, ताराचंद पिवळ, अनिल विघ्ने, गणेश महाजन, सखुबाई मिसाळ, अनिता पवार, निलोफर शेख आदी दिव्यांग बांधव उपस्थित होते.

COMMENTS