Homeताज्या बातम्या

आणीबाणीच्या परिस्थितीसाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करा; मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या सूचना

मुंबई : पावसाळ्यात संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचे नियोजन करताना रेल्वे, महानगरपालिका, बेस्ट आणि जिल्हाधिकारी कार्यालये, मेट्रो आणि अन्य प्राधिकरणे

सोमनाथ मंदिर भारताच्या अविनाशी आत्म्याचे प्रतीकराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे प्रतिपादन
तर नवाब मलिकांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही – आशिष शेलार
महाराष्ट्रात मंत्र्यांच्या विमान प्रवासावर निर्बंधमुख्यमंत्री फडणवीस यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक

मुंबई : पावसाळ्यात संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचे नियोजन करताना रेल्वे, महानगरपालिका, बेस्ट आणि जिल्हाधिकारी कार्यालये, मेट्रो आणि अन्य प्राधिकरणे यांनी सर्वसमावेशक आराखडा तयार करून समन्वयाने काम करण्याच्या सूचना मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिल्या.

मुंबईतील रेल्वेच्या हद्दीत येणाऱ्या नालेसफाईच्या कामाचा व मान्सूनपूर्व कामाचा आढावा घेण्यासाठी मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. शेलार यांनी पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयात समन्वय बैठक घेतली. या बैठकीला मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे, मध्य रेल्वेचे विभागीय महाव्यवस्थापक हिरेश मीणा, पश्चिम रेल्वेचे विभागीय महाव्यवस्थापक पंकज सिंग यांच्यासह मुंबई शहर आणि उपनगराचे जिल्हाधिकारी, महानगरपालिका, रेल्वे, फायर ब्रिगेडचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले की, दुर्दैवाने पूर परिस्थिती निर्माण झाली तर ज्या रेल्वे स्टेशनवर गर्दी होईल अशा रेल्वे स्टेशनमधून गर्दी बाहेर काढणे, बाहेरच्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करणे, प्रवाशांना पाणी, अन्नपदार्थ देणे या एकूण परिस्थितीचा सर्वसमावेशक आराखडा तयार करा. तसेच दोन्ही प्राधिकरणांचे सीसीटीव्ही आणि सूचना देणारी यंत्रणा, आपत्कालीन कक्ष यामध्ये समन्वय ठेवा. रेल्वे स्टेशनमधील आणि बाहेरील पादचारी पूल, वाहतुकीचे पूल, रेल्वे स्टेशन परिसरातील होर्डिंग या सगळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करा. रेल्वे आणि महानगरपालिका यांचे पंप यांचाही सर्वसमावेशक आराखड्यात सुव्यवस्थित समावेश करण्याच्या सूचना मंत्री शेलार यांनी केल्या. तसेच मशीद बंदर आणि परिसरातील रेल्वे हद्दीत येणाऱ्या व धोकादायक ठरलेल्या २४ इमारती आणि काही झोपड्या यांचे पुनर्वसन व तेथील रहिवासी याबाबींचा सविस्तर अहवाल तयार करून शासनाकडे पाठविण्याच्या सूचनाही मंत्री ॲड. शेलार यांनी केल्या.

पश्चिम रेल्वेने सांगितले की, पाण्याचा निचरा करण्यासाठी चर्चगेट ते विरारदरम्यान एकूण १५ मायक्रो टनेल रेल्वे ट्रॅक खालून करण्यात आले असून या वर्षात ४ मायक्रो टनेल पूर्ण करण्यात आले आहेत. तर पाणी उपसण्यासाठी पंपांची संख्या वाढवून यावेळी १२६ पंप बसवण्यात आले आहेत. २४०० वॅगन गाळ काढण्यात आला आहे. मध्य रेल्वे मार्गावरही पंपांची संख्या वाढवण्यात आली असून २२० पंप बसवण्यात आले आहेत. ३५० किलोमीटर लांबीच्या मार्गावरील १६० नाले व गटारांची सफाई करण्यात आली आहे. दोन्ही मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे आणि पर्जन्यमापक बसवण्यात आले आहेत. यावेळी कांजूरमार्ग येथील उषा नगर नाला आणि कुर्ला येथील ब्राह्मणवाडी नाल्याच्या खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामे करण्यात आल्याने पाण्याचा निचरा वेगाने होऊ शकेल.

COMMENTS