Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जामखेडमध्ये ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाचे सामूहिक वाचन

जामखेड : वंचित बहुजन आघाडी व समविचारी पक्षांच्या वतीने ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे सामूहिक वाचन करत वादग्रस्त वक्तव्यांचा निषेध करण्यात आला. जामखेड येथील तहसील कार्यालयासमोर झालेल्या या कार्यक्रमात संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. राज्य प्रवक्ते ऍड. डॉ. अरुण जाधव व नगरसेविका संगीता भालेराव यांच्या नेतृत्वाखाली हे वाचन आंदोलन पार पडले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना आमदार संजय गायकवाड तसेच बागेश्वर महाराज यांनी केलेल्या कथित अपशब्दांविरोधात संताप व्यक्त करत निषेध नोंदविण्यात आला. या वेळी ऍड. डॉ. अरुण जाधव यांनी ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकातील विविध मुद्द्यांवर भाष्य केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा लोकाभिमुख राज्यकारभार, रयतेप्रती असलेली कणव, सामाजिक समता, धार्मिक सहिष्णुता, स्त्रियांच्या सन्मानाचे संरक्षण, तसेच व्यापार, उद्योग व शेतीविषयक धोरणे यांचा त्यांनी उल्लेख केला. तसेच शिवाजी महाराजांचे सहकारी, त्यांची प्रशासनव्यवस्था, विविध समाजघटकांशी असलेले संबंध आणि त्या काळातील सामाजिक-राजकीय परिस्थिती याबाबतही पुस्तकातील विचार मांडण्यात आले. या सामूहिक वाचनात बापू ओहोळ, शहाजी डोके, रजनी बागवान, संगीता भालेराव व उर्मिला कवडे यांनी सहभाग घेत पुस्तकातील निवडक भागांचे वाचन केले. दरम्यान, संबंधित व्यक्तींनी केलेल्या वक्तव्यांविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. 

शेतात गळफास घेऊन आत्महत्या
संजीवनी इंजिनिअरिंगच्या १२ विद्यार्थ्यांंना नोकरी
शेवगावमध्ये महिलांना चाकूच्या धाकावर लुटण्याचे प्रयत्न; कारवाईची मागणी; नागरिकांचे पोलिसांना निवेदन

जामखेड : वंचित बहुजन आघाडी व समविचारी पक्षांच्या वतीने ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे सामूहिक वाचन करत वादग्रस्त वक्तव्यांचा निषेध करण्यात आला. जामखेड येथील तहसील कार्यालयासमोर झालेल्या या कार्यक्रमात संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली.

राज्य प्रवक्ते ऍड. डॉ. अरुण जाधव व नगरसेविका संगीता भालेराव यांच्या नेतृत्वाखाली हे वाचन आंदोलन पार पडले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना आमदार संजय गायकवाड तसेच बागेश्वर महाराज यांनी केलेल्या कथित अपशब्दांविरोधात संताप व्यक्त करत निषेध नोंदविण्यात आला.

या वेळी ऍड. डॉ. अरुण जाधव यांनी ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकातील विविध मुद्द्यांवर भाष्य केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा लोकाभिमुख राज्यकारभार, रयतेप्रती असलेली कणव, सामाजिक समता, धार्मिक सहिष्णुता, स्त्रियांच्या सन्मानाचे संरक्षण, तसेच व्यापार, उद्योग व शेतीविषयक धोरणे यांचा त्यांनी उल्लेख केला.

तसेच शिवाजी महाराजांचे सहकारी, त्यांची प्रशासनव्यवस्था, विविध समाजघटकांशी असलेले संबंध आणि त्या काळातील सामाजिक-राजकीय परिस्थिती याबाबतही पुस्तकातील विचार मांडण्यात आले.

या सामूहिक वाचनात बापू ओहोळ, शहाजी डोके, रजनी बागवान, संगीता भालेराव व उर्मिला कवडे यांनी सहभाग घेत पुस्तकातील निवडक भागांचे वाचन केले. दरम्यान, संबंधित व्यक्तींनी केलेल्या वक्तव्यांविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. 

COMMENTS