कोरोनामुळे साई मंदिराची कवाडे पुन्हा बंद

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरोनामुळे साई मंदिराची कवाडे पुन्हा बंद

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाच्या ब्रेक दि चेन या धोरणांतर्गत 30 एप्रिलपर्यंत साईमंदीर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.

वडिलांच्या स्मरणार्थ गावासाठी बांधून दिला साडेपाच लाखाचा सभामंडप
नगरमध्ये नव्याने जिल्हा वाहतूक शाखा स्थापन
राज्यस्तरीय वरिष्ठ तायक्वांदो स्पर्धेत नगरला सुवर्णपदके

शिर्डी/प्रतिनिधी : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाच्या ब्रेक दि चेन  या धोरणांतर्गत 30 एप्रिलपर्यंत साईमंदीर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली. भक्तनिवास व्यवस्थाही या काळात बंद असेल. प्रसादालय व कॅन्टीनसुद्धा बाहेरून येणार्‍या भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  

प्रसादालयात केवळ रूग्णालय व कोवीड सेंटरच्या रूग्णांसाठीच जेवण बनवले जाणार असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. या वेळी मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे, वैद्यकीय संचालक डॉ. प्रीतम वडगावे, डॉ. मैथिली पितांबरे, मंदीर प्रमुख रमेश चौधरी, संरक्षण प्रमुख परदेशी तसेच विविध विभागांच्य प्रमुखांची उपस्थिती होती. साई संस्थानच्या इतिहासात साथीचा संसर्ग रोखण्यासाठी तिसर्‍यांदा मंदीर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येत आहे. 1941 मध्ये कॉलराचा संसर्ग रोखण्यासाठी मंदीर ऐन रामनवमीत बंद ठेवण्यात आले. तसेच शिर्डीत आलेल्या भक्तांना लस टोचण्यात आली. बाहेरून येणार्‍या भाविकांना पोलिसांनी शिर्डीच्या शिवेवर अडवून तेथूनच परत पाठवले. यानंतर कोरोनाचा संसर्ग सुरू होताच 17 मार्च 2020 रोजी दुपारी तीन वाजेपासून 15 नोव्हेंबर 2020 रात्रीपर्यंत मंदीर बंद ठेवण्यात आले. 16 नोव्हेंबरला मंदीर पुन्हा सुरू झाल्यानंतरही 23 फेब्रुवारी 2021 पासुन दर्शनाच्या वेळा सकाळी सहा ते रात्री नऊ पर्यंत कमी करण्यात आल्या. यामुळे पहाटेची व रात्रीची आरती भक्ताविना होवू लागली. त्यानंतरही कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेवून 28 मार्च 2021 पासुन वेळेत आणखी कपात करून दर्शनाची वेळ सकाळी सव्वा सात ते रात्री पावणे आठ करण्यात आली. यानंतर आज, सोमवारी रात्री आठ वाजेपासून शासनाच्या ब्रेक दि चेन धोरणानूसार पुन्हा मंदीर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान मंदीर काही दिवसांसाठी बंद होणार असल्याने शिर्डीकरांनी दर्शनासाठी मंदिराकडे धाव घेतली.

COMMENTS