Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संजीवनी इंजिनिअरिंगच्या नऊ विद्यार्थ्यांना नोकरी  

कोपरगाव : उद्योगांना आवश्यक तांत्रिक कौशल्ये व अद्ययावत ज्ञान असलेले अभियंते घडविण्यावर भर देणाऱ्या संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या नऊ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये आकर्षक पॅकेजवर निवड झाली आहे. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ही यशस्वी कामगिरी शक्य झाल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले. बुहलर अँड शेर्लर या स्वित्झर्लंडस्थित बहुराष्ट्रीय कंपनीने इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग शाखेतील चार विद्यार्थ्यांची निवड केली आहे. यामध्ये गणेश किसन गायकवाड, संतोष मच्छिंद्र औताडे, पूजा भाऊसाहेब कोते व कल्याणी सतीश थोरात यांचा समावेश आहे. तसेच रॅक असेट मॅनेजमेंट सिस्टीम या कंपनीने सिव्हिल व स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग शाखेतील पाच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी दिली आहे. यामध्ये प्रतिक्षा सुरेश बिलवाल, ओमकार प्रकाश डहाळे, श्रावण आदिनाथ कावळे आणि अमनराजे अनिमा पाटील यांची निवड झाली आहे.  संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.  कॉलेजमध्ये उद्योगाभिमुख प्रकल्पांवर विशेष भर दिला जातो. अंतिम वर्षात विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष उद्योगांसाठी उपयुक्त प्रोजेक्ट्स करून घेतले जातात. या प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना मुलाखतीत यश मिळण्यास मदत होत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये उद्योगांना अभिप्रेत असणारे प्रोजेक्ट्स विद्यार्थ्यांनी अंतिम वर्षात  करावे, यावर कॉलेजचा भर असतो. मला ‘अँसिस इजलेक्ट्रॉनिक्स डेस्कटॉप’ हे इलेक्ट्रिकल सॉफ्टवेअर वापरून प्रोजेक्ट करण्याची संधी मिळाली. त्याचा फायदा मला मुलाखतीमध्ये झाला.  – गणेश गायकवाड,  विद्यार्थी, संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज

नवोदय प्रवेश परीक्षेत ‘श्री संत वामनभाऊ’च्या दोन विद्यार्थ्यांची निवड
पोलीस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्लाचौघांसह ११ अनोळखी इसमांवर गुन्हा
कृषी संकल्प उत्तम; पण ‘कायाकल्प किती होणार’? : डॉ. मुळीक 

कोपरगाव : उद्योगांना आवश्यक तांत्रिक कौशल्ये व अद्ययावत ज्ञान असलेले अभियंते घडविण्यावर भर देणाऱ्या संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या नऊ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये आकर्षक पॅकेजवर निवड झाली आहे. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ही यशस्वी कामगिरी शक्य झाल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले.

बुहलर अँड शेर्लर या स्वित्झर्लंडस्थित बहुराष्ट्रीय कंपनीने इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग शाखेतील चार विद्यार्थ्यांची निवड केली आहे. यामध्ये गणेश किसन गायकवाड, संतोष मच्छिंद्र औताडे, पूजा भाऊसाहेब कोते व कल्याणी सतीश थोरात यांचा समावेश आहे.

तसेच रॅक असेट मॅनेजमेंट सिस्टीम या कंपनीने सिव्हिल व स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग शाखेतील पाच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी दिली आहे. यामध्ये प्रतिक्षा सुरेश बिलवाल, ओमकार प्रकाश डहाळे, श्रावण आदिनाथ कावळे आणि अमनराजे अनिमा पाटील यांची निवड झाली आहे.  संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 कॉलेजमध्ये उद्योगाभिमुख प्रकल्पांवर विशेष भर दिला जातो. अंतिम वर्षात विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष उद्योगांसाठी उपयुक्त प्रोजेक्ट्स करून घेतले जातात. या प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना मुलाखतीत यश मिळण्यास मदत होत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये उद्योगांना अभिप्रेत असणारे प्रोजेक्ट्स विद्यार्थ्यांनी अंतिम वर्षात  करावे, यावर कॉलेजचा भर असतो. मला ‘अँसिस इजलेक्ट्रॉनिक्स डेस्कटॉप’ हे इलेक्ट्रिकल सॉफ्टवेअर वापरून प्रोजेक्ट करण्याची संधी मिळाली. त्याचा फायदा मला मुलाखतीमध्ये झाला.  – गणेश गायकवाड,  विद्यार्थी, संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज

COMMENTS