जामखेड : महापुरुषांची जयंती साजरी करणे म्हणजे त्यांच्या विचारांची जनजागृती होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा उत्सव असल्याने ती शांतता व सुव्यवस्थेत साजरी करावी, असे आवाहन ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात यांनी केले. १४ एप्रिल रोजी होणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर जामखेड पोलिस ठाण्यात दि. ३ एप्रिल रोजी शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रविण लोखंडे, तहसीलदार धनंजय बांगर, पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व शांतता समिती सदस्य उपस्थित होते. प्रा. राळेभात म्हणाले की, जयंतीनिमित्त होणाऱ्या अभिवादन कार्यक्रमांना प्रशासनातील अधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे. तसेच मिरवणुका व इतर कार्यक्रम शांततेत पार पाडावेत, असे त्यांनी सांगितले. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रविण लोखंडे यांनी सांगितले की, उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कार्यकर्ते व पोलिस प्रशासन यांच्यात समन्वय आवश्यक आहे. मिरवणुका काढण्यासाठी पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असून नगरपरिषद हद्दीत एकच स्वागत कक्ष उभारावा. तसेच वाहतूक व्यवस्थेतील अडथळे दूर करणे, विजेच्या लोंबकळणाऱ्या तारा दुरुस्त करणे, पार्किंगची व्यवस्था आदी बाबींवर लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी ऍड. डॉ. अरुण जाधव यांनी महावितरण, पोलिस विभाग व नगरपरिषद यांनी विशेष दक्षता घ्यावी, असे नमूद केले. प्रा. कैलास माने, प्रा. विकी घायतडक, सुनील जावळे, संध्या सोनवणे यांनीही मनोगते व्यक्त केली. बैठकीच्या शेवटी पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी फ्लेक्स लावताना नगरपरिषदेची परवानगी घेणे आवश्यक असल्याचे सांगत, डिजेवर बंदी असल्याने नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.

जामखेड : महापुरुषांची जयंती साजरी करणे म्हणजे त्यांच्या विचारांची जनजागृती होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा उत्सव असल्याने ती शांतता व सुव्यवस्थेत साजरी करावी, असे आवाहन ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात यांनी केले.
१४ एप्रिल रोजी होणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर जामखेड पोलिस ठाण्यात दि. ३ एप्रिल रोजी शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रविण लोखंडे, तहसीलदार धनंजय बांगर, पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व शांतता समिती सदस्य उपस्थित होते.
प्रा. राळेभात म्हणाले की, जयंतीनिमित्त होणाऱ्या अभिवादन कार्यक्रमांना प्रशासनातील अधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे. तसेच मिरवणुका व इतर कार्यक्रम शांततेत पार पाडावेत, असे त्यांनी सांगितले.
उपविभागीय पोलिस अधिकारी प्रविण लोखंडे यांनी सांगितले की, उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कार्यकर्ते व पोलिस प्रशासन यांच्यात समन्वय आवश्यक आहे. मिरवणुका काढण्यासाठी पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असून नगरपरिषद हद्दीत एकच स्वागत कक्ष उभारावा. तसेच वाहतूक व्यवस्थेतील अडथळे दूर करणे, विजेच्या लोंबकळणाऱ्या तारा दुरुस्त करणे, पार्किंगची व्यवस्था आदी बाबींवर लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी ऍड. डॉ. अरुण जाधव यांनी महावितरण, पोलिस विभाग व नगरपरिषद यांनी विशेष दक्षता घ्यावी, असे नमूद केले. प्रा. कैलास माने, प्रा. विकी घायतडक, सुनील जावळे, संध्या सोनवणे यांनीही मनोगते व्यक्त केली.
बैठकीच्या शेवटी पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी फ्लेक्स लावताना नगरपरिषदेची परवानगी घेणे आवश्यक असल्याचे सांगत, डिजेवर बंदी असल्याने नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.

COMMENTS