शिर्डी: शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अन्नभेसळ प्रतिबंधक पथकाने मोठी कारवाई करत विविध पेढे उत्पादन करणाऱ्या फॅक्टरी तसेच मिठाई विक्रीच्या द

शिर्डी: शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अन्नभेसळ प्रतिबंधक पथकाने मोठी कारवाई करत विविध पेढे उत्पादन करणाऱ्या फॅक्टरी तसेच मिठाई विक्रीच्या दुकानांवर धाड टाकली. या कारवाईदरम्यान संशयित व निकृष्ट दर्जाचा हजारो किलो खाद्यपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साईबाबा दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता पेढे व मिठाई उत्पादन करणाऱ्या काही आस्थापनांमध्ये अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असल्याची गुप्त माहिती प्रशासनाला प्राप्त झाली होती. त्यानुसार अन्नभेसळ पथकाने अचानक तपासणी मोहीम राबवून विविध ठिकाणांहून खाद्यपदार्थांचे नमुने ताब्यात घेतले.
या धडक कारवाईत मोठ्या प्रमाणात पेढे, दूधजन्य पदार्थ, खाद्यतेल तसेच अन्य साहित्य जप्त करण्यात आले असून, त्यांचे नमुने प्रयोगशाळेत पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेच्या तपासणी अहवालानंतर दोषी संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
प्रशासनाच्या या अचानक सुरू झालेल्या धाडसत्रामुळे शिर्डीतील मिठाई व्यावसायिकांमध्ये तीव्र खळबळ उडाली आहे. भाविकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या नफेखोरांविरोधात अशाच प्रकारच्या कडक कारवाया पुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचा कडक इशारा प्रशासनाने दिला आहे.

COMMENTS