पुणे : पुण्यातील पिंपरी येथील मोशी परिसरातील करिश्मा ग्लोरी सोसायटीमध्ये आर्थिक विवंचनेतून विषारी पदार्थ सेवन केलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृ

पुणे : पुण्यातील पिंपरी येथील मोशी परिसरातील करिश्मा ग्लोरी सोसायटीमध्ये आर्थिक विवंचनेतून विषारी पदार्थ सेवन केलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. पती विनोद पिंगे यांच्या मृत्यूनंतर उपचाराधीन असलेल्या पत्नी सिरोजा पिंगे आणि मुलगी पूर्णिमा पिंगे यांचीही प्राणज्योत मावळली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृतांमध्ये विनोद पिंगे (वय ५०), त्यांची पत्नी सिरोजा पिंगे (वय ४५) आणि मुलगी पूर्णिमा पिंगे (वय १९) यांचा समावेश आहे. पिंगे कुटुंब मोशीतील करिश्मा ग्लोरी सोसायटीमधील एका सद्सनेत राहत होते.

COMMENTS