Homeताज्या बातम्या

कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबीर; शिंगणापूर येथील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये १०० हून अधिक रुग्णांची तपासणी

कोपरगाव शहर: संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांचा २१ जून रोजी झालेला ६५ वा वाढदिवस मतदार संघात विविध शैक्षणिक व आरोग्य शिबीर राबवत स

टेंभुर्णी येथे वारकऱ्यांचा घोंगडी देऊन सन्मान; सुरेंद्रभाऊ थोरात मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम
कामाच्या आमिषाने जाळे; अश्लील व्हिडिओच्या धमकीवर लाखाची खंडणी! भाग्यनगर पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईत ५ जण जेरबंद
व्यवस्थापन कोट्याच्या नावाखाली कोट्यवधींचा खेळ? उच्च शिक्षण विभागाचा दणका; शिक्षण सम्राटांच्या अडचणी वाढल्या

कोपरगाव शहर: संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांचा २१ जून रोजी झालेला ६५ वा वाढदिवस मतदार संघात विविध शैक्षणिक व आरोग्य शिबीर राबवत साजरा करण्यात आला. त्याच अनुषंगाने तालुक्यातील शिंगणापूर गावात मोफत आरोग्य शिबीर राबवत बिपीन कोल्हे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

शिंगणापूर गावाचे लोकनियुक्त सरपंच डॉ. विजय काळे यांनी आपल्या श्रद्धा हॉस्पिटलमध्ये मंगळवारी (दि. २३) मोफत आरोग्य शिबीर राबवले. या शिबिरात गावातील १०० पेक्षा अधिक रुग्णांची मोफत हिमोग्लोबिन, रक्तातील साखर, रक्तगट आणि बीपी तपासणी करण्यात आली, तसेच त्यांना मोफत आरोग्य मार्गदर्शनही केले गेले. यासोबतच शालेय विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करत कोल्हे यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. डॉ. काळे यांना या उपक्रमात त्यांच्या पत्नी आणि माजी ग्रामपंचायत सदस्य राजश्री काळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या प्रसंगी गावचे उपसरपंच शाम सवत्सरकर, सामाजिक कार्यकर्ते भीमा संवत्सरकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष दत्तू सवत्सरकर, लक्ष्मीकांत सवत्सरकर, ग्रामपंचायत सदस्य अशोक वराट, प्रसाद आढाव, मनोज इंगळे, सुरेश सोनपसारे, सुनील आढाव, गणेश वाणी, राजू काळे, सुखदेव कसबे, मेजर कानडे, मुख्याध्यापक खेमनर, हरकल, दत्तात्रय चव्हाण, सोमनाथ आजगे, केरू कुर्हे, छाया काळे, संगीता काळे, रूपाली कुऱ्हे, द्वारकाबाई इंगळे, कमळा आजी, रखमाआई, ग्रामपंचायत कर्मचारी अनिल व कुणाल, इम्रान सय्यद, पंकज पडवळ, शुभम घोडेस्वार आदींसह ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS