वाघाच्या हल्ल्यात गावकर्‍याचा मृत्यू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाघाच्या हल्ल्यात गावकर्‍याचा मृत्यू

भंडारा : वाघाच्या हल्ल्यात गावकर्‍याचा मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील बांपेवाडा येथे घडली आहे. मोहफुले वेचण्यासाठ

ट्रक उलटल्याने दुचाकीवरील दोघांचा मृत्यू
रुग्णालयाच्या किचनमधून गॅस सिलेंडरची चोरी
लोणार सरोवर विकास कामाला वेग देण्याच्या सुचना विभागीय आयुक्त डॉ. श्‍वेता सिंगल यांनी केली पाहणी
The current image has no alternative text. The file name is: pudharinews_2026-03-19_l6qqbt5l_15-e1774079743847.jpg
The current image has no alternative text. The file name is: esakal_2026-03-20_9o4jyts4_sudhir-jadhav-satara-10-e1774079694739.jpg

भंडारा : वाघाच्या हल्ल्यात गावकर्‍याचा मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील बांपेवाडा येथे घडली आहे. मोहफुले वेचण्यासाठी जंगलाकडे गेलेल्या एका 55 वर्षीय व्यक्तीचा वाघाने बळी घेतला असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. मृतक वसंत गणपत मेश्राम (55, रा. बांपेवाडा) हे गुरुवारी सकाळी आपल्या मुलीसह गावाजवळील शेतशिवारात मोहफुले वेचण्यासाठी गेले होते. सकाळी 10 च्या सुमारास त्यांनी मुलीला घरी परत पाठवले आणि स्वतः काम सुरू ठेवले. मात्र, दुपार उलटूनही वसंत घरी न परतल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. शोध घेतला असता, एका ठिकाणी त्यांचे साहित्य विखुरलेले आढळले आणि काही अंतरावर त्यांचा अर्धवट खाल्लेला मृतदेह सापडला.

COMMENTS