Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘मुळा’त नवीन पाणी आणल्याशिवाय पठार भागाला पाणी नाही : आमदार डॉ. किरण लहामटे ; विविध विकासकामांचे लोकार्पण

अकोले : तालुक्यातील वाघापूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या संयुक्

ब्राह्मणवाडा येथील ब्रिटिशकालीन विश्रामागृह वणव्यात खाक
अकोले तालुक्यात पेट्रोल पंप चालकांच्या अजब नियमामुळे खळबळ; शेतकऱ्यांना डिझेलसाठी आता ‘सातबारा’ द्यावा लागणार? अजित नवलेंचा सरकारवर हल्लाबोल!
‘सकल ओबीसी समाज’ आणि ‘समता परिषदे’तर्फे गुणवंतांचा शाही सत्कार

अकोले : तालुक्यातील वाघापूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या संयुक्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच सिताराम लांडे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. किरण लहामटे उपस्थित होते. 

यावेळी बोलताना आमदार डॉ. लहामटे यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित, बहुजन, आदिवासी तसेच सर्व समाजघटकांसाठी कार्य केले असल्याचे सांगितले. दुर्बल घटकांना सबल करण्यासाठी त्यांनी आरक्षणासारखी ऐतिहासिक तरतूद केली. त्यांचे कार्य प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.

वाघापूर येथील मुळा नदीवरील पूल, लिंगदेव येथील एमआयडीसी तसेच सिद्धार्थनगरमधील रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. तसेच मुळा नदीत नवीन पाणी निर्माण केल्याशिवाय संगमनेर तालुक्यातील पठार भागाला पाणी देणार नसल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

या प्रसंगी आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या निधीतून सिद्धार्थनगर येथे उभारण्यात आलेल्या ३० लाख रुपये खर्चाच्या सभामंडपाचे तसेच ७ लाख रुपये खर्चाच्या समाजमंदिर बांधकामाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमात सिताराम लांडे, राहुल गायकवाड, रोहन गायकवाड, मारुती लांडे, सुरेश गायकवाड, सुनील डोळस, पत्रकार सुनील गीते आणि सखाराम लांडे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी सरपंच रंजनाताई बराते, माजी सरपंच मंदाताई बराते, उपसरपंच महेंद्र बराते, संजय औटी, मिलिंद जाधव, गुलाब जगताप, योगेश लांडे, श्रीकांत गायकवाड, रवी गायकवाड, शुभम निकाळे, विनोद शिंदे, संजय फुलसुंदर, धम्मपाल निकाळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यभान शिंदे यांनी केले, तर भीमराज रकटे यांनी आभार मानले.

COMMENTS