Homeताज्या बातम्या

कार्यकर्ता प्रामाणिक असेल तर नेत्याची खंबीर साथ मिळते – अ‍ॅड. सुभाष राऊत; समता परिषदेची जिल्हास्तरीय बैठक संपन्न

बीड : "कार्यकर्ता प्रामाणिक असेल तर नेत्याची खंबीर साथ मिळते, हे मी अनुभवातून शिकलो आहे. सामाजिक चळवळीच्या माध्यमातून उभी राहिलेली अखिल भारतीय मह

वांबोरीतील विठ्ठल मंदिर वाद चिघळला; कथित भेदभाव व स्वयंघोषित ट्रस्टविरोधात ग्रामस्थांचा धडक मोर्चा
आदेश धाब्यावर; नेकनूर डी.एड. महाविद्यालयातील उर्दू विद्यार्थ्यांचे भवितव्य अडचणीत
बीड जिल्ह्यातील ९७ हजार २२२ शेतकर्‍यांची कर्जमाफी यादी जाहीर; आधार प्रमाणीकरणाचे प्रशासनाचे आवाहन

बीड : “कार्यकर्ता प्रामाणिक असेल तर नेत्याची खंबीर साथ मिळते, हे मी अनुभवातून शिकलो आहे. सामाजिक चळवळीच्या माध्यमातून उभी राहिलेली अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद ही प्रामाणिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वाढवलेली संघटना आहे,” असे प्रतिपादन समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस तथा सिनेट सदस्य अ‍ॅड. सुभाष राऊत यांनी केले. बहुजनांच्या कल्याणासाठी आणि प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी राज्याचे कॅबिनेट मंत्री ना. छगनराव भुजबळ यांनी शाहू-फुले-आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी ही सामाजिक चळवळ सुरू केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बीड येथील शासकीय विश्रामगृहात १ ऑगस्ट २०२६ रोजी अ‍ॅड. सुभाष राऊत यांच्या अध्यक्षतेखाली समता परिषदेची जिल्हास्तरीय बैठक पार पडली. बैठकीच्या सुरुवातीस साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविक करताना बीड जिल्हाध्यक्ष निखिल शिंदे म्हणाले की, आता समता परिषदेची धुरा युवकांच्या हाती सोपवण्यात आली असून, बहुजन समाजातील तरुणांना जोडून संघटनात्मक कार्य विस्तारले जाईल.

यावेळी अ‍ॅड. संदीप बेदरे यांनी अ‍ॅड. सुभाष राऊत यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यात ओबीसी समाजाच्या हक्कासाठी झालेल्या आंदोलनांचा आढावा घेतला. याप्रसंगी अ‍ॅड. सुभाष राऊत यांनी गेल्या २५ वर्षांतील कार्याचा उजागर करत लवकरच तालुका स्तरावर बैठका घेऊन नवीन कार्यकारिणी जाहीर करण्याचे निर्देश जिल्हाध्यक्ष निखिल शिंदे व कार्याध्यक्ष अविनाश उगले यांना दिले. बैठकीस नितीन साखरे, जगन खेत्री, किशोर चौधरी, बापू गाडेकर, सचिन राऊत, दीपक भुजबळ, कृष्णा शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व समता सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन शहराध्यक्ष नितीन राऊत यांनी तर आभार प्रदर्शन अविनाश उगले यांनी केले.

COMMENTS