राहुल गांधी व उद्धव ठाकरे यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुल गांधी व उद्धव ठाकरे यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा 

देश विरोधी वक्तव्य करणारे राहुल गांधी व त्यांना समर्थन देणारे उद्धव ठाकरे या दोघांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा

अमरावती  - स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका होत आहे. याबाबत शिवसेना

बच्चू कडू हे नौटंकी छाप आमदार आहेत – आ. रवी राणा
महिलेचा आदर करणाऱ्या बाळासाहेबांचे पुत्र उद्धव ठाकरेंकडून महिलेचा अपमान
राणा दाम्पत्याकडून आमच्या जीवाला धोका

अमरावती  – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका होत आहे. याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राहुल गांधींच्या विधानाशी सहमत नसल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितले मात्र अमरावती जिल्ह्यातील आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरच टीकास्त्र सोडलं,तर उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना रवी राणा यांची जीभ घसरली आहे, राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा उद्धव ठाकरे यांनी समर्थन केल आहे,म्हणून उद्धव ठाकरे यांनी चुल्लू भर पाण्यात डुबून मरायला पाहिजे असं वादग्रस्त विधान केलं, तसेच देश विरोधी वक्तव्य करणारे राहुल गांधी व त्यांना समर्थन देणारे उद्धव ठाकरे या दोघांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा अन्यथा मी आंदोलन करेल असा इशारा रवी राणा यांनी दिला आहे .

COMMENTS