Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोंडवे येथील गाडे वाड्याला आग; घरातील साहित्य जळून नुकसान

सातारा / प्रतिनिधी : सातारा तालुक्यातील कोंडवे येथील पुरातन काळातील असलेल्या गाडे वाड्याला काल रात्री अचानक आग लागली. या आगीमध्ये वाड्यामधील तीन घरात

कराड-विटा मार्गावर दुचाकीच्या स्फोटाने खळबळ
कोल्हापूरमध्ये ट्रॅपचे आणखी दोन प्रकार उघड; दोन व्यापार्‍यांना 36 लाखाला लुटले
प्रवेशादरम्यान शैक्षणिक शुल्कासंदर्भात तक्रार आल्यास कारवाई : मोहन गायकवाड

सातारा / प्रतिनिधी : सातारा तालुक्यातील कोंडवे येथील पुरातन काळातील असलेल्या गाडे वाड्याला काल रात्री अचानक आग लागली. या आगीमध्ये वाड्यामधील तीन घरातील घरगुती साहित्य जळून गाडे कुटुंबियांचे मोठे नुकसान झाले. या घटनेत मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, बुधवारी मध्यरात्री जुन्या काळातील लाकडाच्या असलेल्या गाडे वाड्याला अचानक आग लागली. आग लागल्याची चाहूल वाड्यात राहणार्‍या कुटुंबातील एका व्यक्तीस लागली. लाकडाच्या वाड्याने पेट घेतल्याने आगीचा भडाका उडाला होता.
गावकर्‍यांनी दूरध्वनीवरून सातारा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला घटनेबाबत कळविले. घटनास्थळी अग्निशामन दल दाखल होऊन अग्निशामन बंबाच्या सहाय्याने सुमारे दीड तासाच्या अथक प्रयत्नातून आग आटोक्यात आणण्यात यश आले. आग आटोक्यात आणण्यासाठी गावकर्‍यांनी मोठी धडपड केली होती. आगीत घरातील कपडे, धान्य, कपाट आदी साहित्य जळून रहिवाशाचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, या वाड्यात एका व्यक्ती शिवाय कोणीही राहवयास नसल्याने मोठी जीवितहानी टळली.
वाड्याला लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केल्याने शेजारच्या घरांना आगीची झळ लागून घरांच्या भीतींना तडे गेले. यामुळे काही प्रमाणात शेजारील घरांचे नुकसान झाले आहे. अचानक लागलेल्या आगीचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही.

COMMENTS