Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्विमिंग पूल आणि विहिरीतला फरक जीवावर बेतला; धाराशिवमध्ये सुट्टीत आलेल्या विद्यार्थ्याचा विहिरीत बुडून मृत्यू

धाराशिव : उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये गावी येण्याचा आनंद एका कुटुंबासाठी कधीही भरून न निघणाऱ्या दु:खात बदलला आहे. स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा सर

डोंबिवली स्थानकाजवळ लोकलचे ३ डबे रुळावरून घसरले; सुदैवाने गाडी रिकामी असल्याने मोठा अनर्थ टळला!
एअरबॅगचा अनपेक्षित स्फोट ठरला जीवघेणा; मीरा रोड परिसरात कार विक्रेत्याचा मृत्यू।लोकमंथन News२४
छतावर टेंट उभारताना विजेचा धक्का; देगलूरातील 27 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यूबारशाच्या कार्यक्रमाच्या तयारीदरम्यान घडली दुर्घटना

धाराशिव : उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये गावी येण्याचा आनंद एका कुटुंबासाठी कधीही भरून न निघणाऱ्या दु:खात बदलला आहे. स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा सराव असलेल्या एका तरुणाला विहिरीच्या खोलीचा अंदाज आला नाही आणि वडिलांच्या डोळ्यांदेखत त्याचा बुडून मृत्यू झाला. धाराशिवच्या परंडा तालुक्यातील भोंजा शिवारात ही हृदयद्रावक घटना घडली आहे.
पुण्यात शिक्षणासाठी असलेला शुभम ननवरे हा १९ वर्षांचा तरुण कुंभेजा येथील आपल्या घरी जागरण गोंधळासाठी आला होता. उन्हाळ्याचा तडाखा असल्याने तो आपल्या वडील, बहीण आणि नातेवाइकांसह जवळच असलेल्या एका विहिरीवर पोहण्यासाठी गेला. पण तिथे जे घडलं, त्याने संपूर्ण जिल्हा हळहळला आहे.
शुभमला स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा अनुभव होता, मात्र विहिरीच्या नैसर्गिक खोलीचा आणि पाण्याचा अंदाज त्याला आला नाही. शुभमसोबत त्याची बहीण शुभांगी आणि मामाचा मुलगा ओंकारही पाण्यात उतरले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही बुडू लागले. मुलांचा ओरडा ऐकून काठावर उभ्या असलेल्या वडिलांनी आणि चुलत्यांनी जीवाची पर्वा न करता विहिरीत उड्या मारल्या.
वडिलांनी शुभांगी आणि ओंकारला तर सुखरूप बाहेर काढले, पण दुर्दैवाने त्याच वेळी शुभमचा हात निसटला आणि तो वडिलांच्या डोळ्यांदेखत खोल पाण्यात गडप झाला. दुपारी विहिरीतील पाण्याचा उपसा केल्यानंतर शुभमचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
एका बाजूला बहिणीचा जीव वाचल्याचं समाधान होतं, तर दुसरीकडे पोटचा गोळा डोळ्यांदेखत गेल्याचं दु:ख. या घटनेने परंडा तालुक्यात शोककळा पसरली असून, विहिरीत पोहताना तरुणांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

COMMENTS