Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्री अगस्ति ऋषी आश्रमात कीर्तन महोत्सव 

अकोले : तालुक्याचे श्रद्धास्थान असलेल्या श्री अगस्ति ऋषी मंदिरात पुरुषोत्तम मासानिमित्त अखंड  दि. १७ मे ते १६ जून या कालावधीत महिनाभर कीर्तन महोत्सवासह विविध धार्मिक, सामाजिक आणि प्रबोधनपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष के. डी. धुमाळ यांनी दिली. कीर्तन महोत्सवात निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर, माधव राठी, जगदीश जोशी, जयंत गोसावी, महादेव महाराज राऊत, देविदास म्हस्के, जयेश महाराज भाग्यवंत, दीपक देशमुख, विठ्ठलपंत गोंडे, कृष्णा देशमुख, गणेश वाकचौरे, दत्तात्रय भोर, मदन वरपे, सुनील भोकनळ, गोविंद करंजकर, सुदाम कोकणे, व्यंकटेश सोनवणे, गणेश कानवडे, विवेक केदार, अरुण शिर्के, नितीन गोडसे यांची कीर्तन सेवा होईल.  तसेच डॉ. बाळचंद वाकचौरे, यशवंत भांगे, परशराम कानवडे, समाधान भोर, कुंडलिक मोखरे, रोहिदास झोळेकर, देवराम ईदे, सुरेश भालेकर, अरुण फरगडे, विश्वनाथ शेटे, गोविंद पुंडे, कैलास आहेर, पांडुरंग फरगडे, देवा वाकचौरे, नितीन देशमुख, नामदेव चौधरी, राजेंद्र ढोण्णर, डॉ. विजय शेडगे  बाळासाहेब खताळ, रमेश कानवडे आणि हौशीराम कोल्हे यांची प्रवचन सेवा होईल. दि. १६ जून रोजी उध्दव महाराज मंडलिक यांच्या काल्याच्या कीर्तनाने महोत्सवाची सांगता होणार आहे.  रविवारी (दि. १७) आमदार डॉ. किरण लहामटे, निवृत्ती महाराज देशमुख, योगी केशव बाबा चौधरी आणि ज्येष्ठ विश्वस्त बद्रिनाथ मुंदडा यांच्या हस्ते महोत्सवाचा प्रारंभ होईल.  महोत्सवादरम्यान मोफत नेत्रतपासणी, शेतकरी मेळावा, दुग्ध व्यवसाय मार्गदर्शन शिबीर, मोफत आरोग्य तपासणी व सर्वरोग निदान शिबीर आदी सामाजिक उपक्रम पार पडतील.

कोकणवाडी येथे जाधव भावकीचा स्नेह मेळावा उत्साहात
महागाईचा भडका! केवळ ‘काटकसर’ सांगून भागणार नाही, सरकारने थेट कर कमी करावेत; डॉ. अजित नवले कडाडले!
तलाव उशाला कोरड घशाला, आठ महिन्यापासून जलजीवन ठप्प

अकोले : तालुक्याचे श्रद्धास्थान असलेल्या श्री अगस्ति ऋषी मंदिरात पुरुषोत्तम मासानिमित्त अखंड  दि. १७ मे ते १६ जून या कालावधीत महिनाभर कीर्तन महोत्सवासह विविध धार्मिक, सामाजिक आणि प्रबोधनपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष के. डी. धुमाळ यांनी दिली.

कीर्तन महोत्सवात निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर, माधव राठी, जगदीश जोशी, जयंत गोसावी, महादेव महाराज राऊत, देविदास म्हस्के, जयेश महाराज भाग्यवंत, दीपक देशमुख, विठ्ठलपंत गोंडे, कृष्णा देशमुख, गणेश वाकचौरे, दत्तात्रय भोर, मदन वरपे, सुनील भोकनळ, गोविंद करंजकर, सुदाम कोकणे, व्यंकटेश सोनवणे, गणेश कानवडे, विवेक केदार, अरुण शिर्के, नितीन गोडसे यांची कीर्तन सेवा होईल.

 तसेच डॉ. बाळचंद वाकचौरे, यशवंत भांगे, परशराम कानवडे, समाधान भोर, कुंडलिक मोखरे, रोहिदास झोळेकर, देवराम ईदे, सुरेश भालेकर, अरुण फरगडे, विश्वनाथ शेटे, गोविंद पुंडे, कैलास आहेर, पांडुरंग फरगडे, देवा वाकचौरे, नितीन देशमुख, नामदेव चौधरी, राजेंद्र ढोण्णर, डॉ. विजय शेडगे  बाळासाहेब खताळ, रमेश कानवडे आणि हौशीराम कोल्हे यांची प्रवचन सेवा होईल. दि. १६ जून रोजी उध्दव महाराज मंडलिक यांच्या काल्याच्या कीर्तनाने महोत्सवाची सांगता होणार आहे.  रविवारी (दि. १७) आमदार डॉ. किरण लहामटे, निवृत्ती महाराज देशमुख, योगी केशव बाबा चौधरी आणि ज्येष्ठ विश्वस्त बद्रिनाथ मुंदडा यांच्या हस्ते महोत्सवाचा प्रारंभ होईल.

 महोत्सवादरम्यान मोफत नेत्रतपासणी, शेतकरी मेळावा, दुग्ध व्यवसाय मार्गदर्शन शिबीर, मोफत आरोग्य तपासणी व सर्वरोग निदान शिबीर आदी सामाजिक उपक्रम पार पडतील.

COMMENTS