Homeताज्या बातम्या

महंगे शिक्षण आणि बेरोजगारीविरोधात सीजेपीचा एल्गार; व्याप‌क जनआंदोलन उभारणार : अभिजित दीपके; सप्टेंबरपासून ‘क्या बोलती पब्लिक’ मोहीम

छ. संभाजीनगर: युवकांचे शिक्षण, वाढती बेरोजगारी, महागडे शिक्षण आणि सर्वसामान्यांच्या मूलभूत प्रश्नांवर व्यापक जनआंदोलन उभारण्याचा निर्धार नागरिक जनआंद

रस्त्यावरील कथित अतिक्रमण प्रकरण पुन्हा चर्चेत; जिल्हा परिषदेकडून चौकशीचे आदेश
कुंडलवाडीच्या भूमिपुत्राची मोठी झेप; सुदर्शन होनवडजकर मुंबईचे सहाय्यक पोलीस आयुक्त
अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यसंपदेचा विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा-बी. एस. सरोदे

छ. संभाजीनगर: युवकांचे शिक्षण, वाढती बेरोजगारी, महागडे शिक्षण आणि सर्वसामान्यांच्या मूलभूत प्रश्नांवर व्यापक जनआंदोलन उभारण्याचा निर्धार नागरिक जनआंदोलन परिषदेचे (सीजेपी) संस्थापक अभिजित दीपके यांनी व्यक्त केला आहे. सप्टेंबरपासून देशभरात ‘क्या बोलती पब्लिक’ ही जनसंवाद मोहीम राबविण्यात येणार असून, नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचना थेट जाणून घेतल्या जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

संस्थेच्या प्रमुख समितीच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना दीपके म्हणाले की, शिक्षण सर्वसामान्यांच्या आवाक्यात यावे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्याला मिळावे, यासाठी देशव्यापी जनजागृती करण्यात येणार आहे. शिक्षणाचा वाढता खर्च अनेक कुटुंबांवर आर्थिक ताण निर्माण करत असल्याने हा प्रश्न आंदोलनाच्या केंद्रस्थानी असेल. त्याचबरोबर युवकांसमोरील बेरोजगारीचा मुद्दाही ठळकपणे मांडला जाईल. देशातील नागरिक आता अधिक निर्भयपणे आपले प्रश्न मांडू लागले असून, विविध सामाजिक विषयांवर लोक रस्त्यावर उतरून आवाज उठवत आहेत, असा दावा दीपके यांनी केला. महापुरुषांच्या विचारांचा आधार घेत लोकांच्या भावना आणि अपेक्षा देशभरात पोहोचवण्यासाठी सातत्याने काम केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

दीपके यांनी सांगितले की, अलीकडील आंदोलनांना मिळालेला प्रतिसाद हा केवळ शिक्षणाच्या प्रश्नापुरता मर्यादित नव्हता. राजकीय व्यवस्था, न्यायव्यवस्था, प्रसारमाध्यमे, शिक्षण व्यवस्था आणि निवडणूक यंत्रणा यांसारख्या संस्थांबाबत नागरिकांमध्ये अस्वस्थता असल्याचे चित्र विविध आंदोलनांमधून दिसून आले, असे मत त्यांनी व्यक्त केले. राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या चर्चांवर भाष्य करताना दीपके यांनी स्पष्ट केले की, सध्या आणखी एका राजकीय पक्षापेक्षा लोकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडणाऱ्या मजबूत दबावगटाची गरज आहे. त्यामुळे स्वतंत्र राजकीय पक्ष उभारण्याचा कोणताही विचार नसून, सामाजिक प्रश्नांवर दबावगट म्हणूनच पुढील वाटचाल केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

शिक्षणाच्या प्रश्नांवर आंदोलन

दीपके यांनी यापूर्वी शिक्षणाशी संबंधित विविध मुद्द्यांवर आंदोलन केले होते. त्या आंदोलनाला देशभरातील विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाल्याचा दावा त्यांनी केला. शिक्षण क्षेत्रातील सुधारणा, पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, यासाठी पुढेही संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. काही दिवसांपूर्वी आपल्याला एका राष्ट्रीय पक्षात प्रवेशाची ऑफर मिळाल्याचा दावा दीपके यांनी केला होता. मात्र, संबंधित पक्षाने हा दावा नाकारला होता. या पार्श्वभूमीवर आगामी काळात त्यांची संघटना सामाजिक आणि सार्वजनिक प्रश्नांवर कोणती भूमिका घेते, याकडे राजकीय आणि सामाजिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

COMMENTS