बीड: मराठवाड्याचे शिक्षक आमदार विक्रम (बप्पा) काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या बुधवार दि. 5 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता स्थळ बीड येथील स्

बीड: मराठवाड्याचे शिक्षक आमदार विक्रम (बप्पा) काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या बुधवार दि. 5 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता स्थळ बीड येथील स्काऊट गाईड कार्यालयाच्या सभागृहात ‘शिक्षक दरबार’ आयोजित करण्यात आला आहे. या शिक्षक दरबारामध्ये जिल्ह्यातील शिक्षकांनी उपस्थित राहून आपल्या अडचणी सोडवून घ्याव्यात असे आवाहन करण्यात येत आहे. बीड जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांच्या विविध प्रलंबित अडचणी जाणून घेऊन त्यांचे तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने बीड शहरातील स्काऊट गाईड भवनात उद्या बुधवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता शिक्षक दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिक्षकाला प्रसंगी शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या समवेत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी, तसेच संबंधित शिक्षण विभागातील अधिकारी, अधिनस्त अधिकारी, तसेच वेतन पथकाचे अधीक्षक हे ही उपस्थित राहून आवश्यक कार्यवाही करणार आहेत. या शिक्षक दरबारात जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिक्षक बांधवांनी उपस्थित राहून आपल्या समस्या सोडवून घ्याव्यात असे आवाहन बीड जिल्हा राष्ट्रवादी शिक्षक संघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष श्री. रवींद्र खोड सर, श्री कल्याणराव वाघमारे सर प्रा डाके, प्रा राजकुमार कागदे, प्रा. संजय वाघमारे, मुख्याध्यापक पाखरे सर, संतोष डोंगरे सर,श्री नवनाथ गिलबीले सर, श्री नामदेव मुंडे सर, श्री नामदेव घरत सर, श्री बाळासाहेब मुळे सर, श्री पवार सर, श्री नारायण गवते सर, शेख सर, श्री हनुमंत मात्रे सर, बीड तालुका अध्यक्ष श्री. संजय शिंदे सर, श्री. नवनाथ मात्रे सर (बीड जिल्हा उपाध्यक्ष ) यांच्यासह इतर पदाधिकार्यांनी केले आहे.

COMMENTS