Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सिद्धी प्रमोद गांधी ‘स्टुडन्ट ऑफ द इयर’ने सन्मानित 

अहिल्यानगर : येथील बीपीएचई सोसायटीचे आय एम एस या व्यवस्थापन संस्थेतील एम बी ए द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी सिद्धी प्रमोद गांधी हिला संस्थेचे संचा

आमदार आशुतोष काळेंनी भाविकांना केले फराळ वाटप
सुरेश जोशी यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा गुळ तुला करून साजरा
अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या रोमिओवर गुन्हा दाखल

अहिल्यानगर : येथील बीपीएचई सोसायटीचे आय एम एस या व्यवस्थापन संस्थेतील एम बी ए द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी सिद्धी प्रमोद गांधी हिला संस्थेचे संचालक डॉ. एम.बी. मेहता यांच्या हस्ते स्टुडन्ट ऑफ द इयरने सन्मानित करण्यात आले. उपसंचालक डॉ. विक्रम बार्नबस, व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. प्रोनोती तेलोरे, संगणक विभाग प्रमुख डॉ. महेश पोतदार आदी उपस्थित होते.

एमबीएच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेतल्यापासून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गोष्टींचे निरीक्षण केले जाते. त्यात त्याची वर्तणूक, शिक्षकांसोबत असणारा संवाद, समूहाने दिलेल्या अनेक उपक्रमामध्ये असलेला सहभाग, शैक्षणिक गुणवत्ता, दोन वर्षात इतर उपक्रम जसे की शोध निबंध, विदयापीठाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या अनेक स्पर्धामधील सहभाग अशा अनेक पातळ्यांवर विद्यार्थ्यांची तपासणी केली जाते. अभ्यासक्रम शिकवणारे सर्व शिक्षकांच्या सहमतीने विद्यार्थ्यांची निवड केली जाते.  सर्व पातळ्यांवर उत्तम कामगिरी केल्यामुळेच गांधी हिची स्टुडन्ट ऑफ द इयर म्हणून निवड करण्यात आली. या सन्मानामुळे इतर विद्यार्थ्यांना देखील वर्षभर चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते.

 यावेळी सिद्धी गांधी हिने मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आय एमं एस सारख्या प्रतिष्ठित संस्थेत मॅनेजमेंटचे शिक्षण घेण्याची संधी मला मिळाली. पहिल्या वर्षापासून येथील शिक्षकांची तळमळ, विषय समजून सांगण्याची हातोटी खूप भावली. विविध उपक्रमांत सहभागी होताना नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. सर्व शिक्षकांनी वेळोवेळी पाठबळ देत प्रोत्साहन दिले. त्याचा स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवताना खूप काही फायदा झाला. भविष्यात येथे मिळालेली संस्कारांची शिदोरी जीवनात कायम उपयोगी पडेल असा विश्वास व्यक्त करत सिद्धी गांधी हिने सर्व शिक्षकांचे, स्टाफचे आभार मानले.

COMMENTS