Homeताज्या बातम्या

पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे उद्घाटन; गरजू रुग्णांना मिळणार मोठा दिलासा

बीड: जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे सोहळयापूर्वक उद्घाटन महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमं

शिक्षक संघटना एवढ्या निद्रिस्त कशा? डॉ. नंदकुमार उघाडे यांचा संतप्त सवाल; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंब्याचे आवाहन
घुले हत्या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करा; आम्ही तपासाला सहकार्य करू; खा. बजरंग सोनवणेंनी मांडली भूमिका, मुलाचे नाव जाणीवपूर्वक ओढल्याचा आरोप
कोपरगाव येथे पाच दिवसीय योग उत्सव उत्साहात; नियमित योगाभ्यास करण्याचे विद्यार्थ्यांन आवाहन

बीड: जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे सोहळयापूर्वक उद्घाटन महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते आज पार पडले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी खासदार बजरंग सोनवणे, आमदार धनंजय मुंडे, आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षिरसागर, आमदार विजयसिंह पंडीत, आमदार विक्रम काळे, पालक सचिव डॉ. राजेश देशमुख, आमदार सुरेश धस, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान, पोलीस अधिक्षक नवनीत काँवत, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी आणि उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख डॉ. सुधीर राऊत यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दुर्धर आजारांवरील उपचारांसाठी आवश्यक ती आर्थिक मदत मिळवून देण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शक केली जाणार आहे. रुग्णालयात आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करून आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी रुग्णालय, रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये समन्वय साधण्याची महत्त्वपूर्ण भूमिका हा कक्ष पार पाडणार आहे.

या उपक्रमामुळे गरजू रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यासाठी आवश्यक असणारी प्रशासकीय प्रक्रिया वेगाने पूर्ण होण्यास मदत होणार असून, शासनाच्या वैद्यकीय सहाय्य योजनांचा थेट लाभ अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचणार आहे.

COMMENTS