परळी: मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सच्या महासचिवपदी परळी येथील उद्योजक तथा व्यापारी संदीपजी लाहोटी यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल रामरक्षा ग

परळी: मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सच्या महासचिवपदी परळी येथील उद्योजक तथा व्यापारी संदीपजी लाहोटी यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल रामरक्षा गोशाळा परिवाराच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी रामरक्षा गोशाळा परिवारातील सदस्यांनी संदीप लाहोटी यांचे अभिनंदन करून त्यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला. व्यापारी, उद्योजक आणि उद्योग क्षेत्राच्या विविध प्रश्नांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तसेच मराठवाड्यातील व्यापार व उद्योग विकासाला चालना देण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा मोठा फायदा होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. संदीप लाहोटी यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सचे कार्य अधिक व्यापक होऊन व्यापारी वर्गाच्या हितासाठी प्रभावी काम होईल, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली. याप्रसंगी रामरक्षा गोशाळा परिवारातील पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. त्यांनी संदीप लाहोटी यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देत त्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी मंगलकामना केल्या.

COMMENTS