गेवराई: महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई शाखा - गेवराई यांच्या वतीने बोरी पिंपळगाव येथील सुरेश राधाकिसन आहेर यांची संघाच्या सदस्यपदी नियुक्ती

गेवराई: महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई शाखा – गेवराई यांच्या वतीने बोरी पिंपळगाव येथील सुरेश राधाकिसन आहेर यांची संघाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दि. २३ जून २०२६ रोजी त्यांना नियुक्तीचे पत्र अधिकृतपणे प्रदान करण्यात आले. हे नियुक्तीपत्र गेवराई तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अंकुश आतकरे यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले आहे.
नियुक्तीपत्रात संघटनेच्या उद्दिष्टांची पूर्तता करणे, पत्रकारांच्या हक्कांसाठी सातत्याने कार्यरत राहणे तसेच संघटनेच्या बळकटीकरणासाठी प्रामाणिकपणे व निष्ठेने काम करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. ही नियुक्ती महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य संघटक संजयजी भोकरे सर, राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे सर, राज्य संपर्क प्रमुख वैभव स्वामी सर यांच्या आदेशाने तसेच ग्रामीण जिल्हाध्यक्ष दीपक काळकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सुरेश आहेर यांच्या सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर ही नवीन जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
त्यांच्या या नियुक्तीमुळे गेवराई तालुक्यातील पत्रकार संघटनेला अधिक बळ मिळणार असून ग्रामीण भागातील पत्रकारांच्या विविध प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना पत्रकार वर्तुळातून व्यक्त होत आहे.
यावेळी विभागीय उपाध्यक्ष सुनील पोपळे, डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्ष अनिल आगुंडे, जिल्हा उपाध्यक्ष बापू गाडेकर, उपाध्यक्ष राजेंद्र नाटकर, भागवत देशपांडे, सचिव तुळशीराम वाघमारे, सुनील घाटूळ, शहराध्यक्ष कैलास हातगुले, कार्याध्यक्ष विष्णू राठोड, प्रा. रामहरी काकडे, अरविंद कुलकर्णी, पिंपळे सर, ओमकार नाटकर, शिवराज कनाके, शिवनाथ काळे, माऊली जाधव, प्रियांका पाटणी, प्रिया पानखडे आदी मान्यवर उपस्थित होते. सुरेश आहेर यांच्या नियुक्तीबद्दल सध्या विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

COMMENTS