Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीगोंदा शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी मच्छिंद्र सुपेकर

श्रीगोंदा प्रतिनिधी ः अखिल भारतीय काँग्रेस श्रीगोंदा शहराच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र (काका) पांडुरंग सुपेकर य

संगमनेरमध्ये मुस्लीमबांधव उतरले रस्त्यावर | LOKNews24
बोठेला मदत करणार्‍या नऊजणांच्या चौकशीतून आणखी तीन नावे निष्पन्न
माऊलीच्या मदतीने तिला मिळतंय आयुष्याचं दान…

श्रीगोंदा प्रतिनिधी ः अखिल भारतीय काँग्रेस श्रीगोंदा शहराच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र (काका) पांडुरंग सुपेकर यांची निवड करण्यात आली. याबाबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या सहीचे नियुक्तीचे पत्र तालुका अध्यक्ष धर्मराज काकडे व प्राध्यापक सुरेशराव रसाळ यांचे हस्ते त्यांना देण्यात आले.

काँग्रेस पक्षाचे विचार, ध्येयधोरणे यांचा प्रचार व प्रसार करण्याचे उत्कृष्ट कार्य मच्छिंद्र सुपेकर यांनी केले आहे.काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी व मा. खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या विविध विकास योजना व विचारांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी आपण सक्रिय आहात.आपल्या सामाजिक कामाची दखल घेऊन आपली श्रीगोंदा शहर काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत आहे. अहमदनगर जिल्ह्याचे माजी महसूल मंत्री व काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात व प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखाली आपण काँग्रेस पक्षाचा विचार समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत रुजवण्यासाठी व पक्ष संघटन वाढीसाठी सक्रिय रहावे असे पत्रात नमूद केले आहे.

या निवडीबद्दल मा.महसुलमंत्री काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात, जिल्हा अध्यक्ष अनुराधा नागवडे, श्रीगोंदा कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोस, काँग्रेस तालुका अध्यक्ष धर्मनाथ काकडे ,श्रीगोंदा कारखान्याचे संचालक सुरेश रसाळ,माधव बनसुडे, पोपटराव बोरुडे, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष मनोहर पोटे,हजारे रावसाहेब, पांडुरंग सप्रे, पवार, केरबा सुपेकर,संजय भुजबळ, राजेंद्र जाधव,सोपानराव सिदनकर, हरिभाऊ काळे, कैलास सुपेकर,कालिदास खेतमाळीस, सुनिल कारंजकर, राहुल सुपेकर, चेअरमन अशोकराव आळेकर,राजू आमले, बाळासाहेब खामकर, अरुण चाकणे,कृष्णा जाधव, माधव बनसोडे,विजय लबडे, विजय शेंडगे, तुषार बोरावके,संजय काळे,आबा शिर्के यांनी अभिनंदन केले.

COMMENTS