कचरा घरात उडाल्याचा राग आल्याने महिलेने घेतला चावा

Homeताज्या बातम्या

कचरा घरात उडाल्याचा राग आल्याने महिलेने घेतला चावा

अहमदनगर/प्रतिनिधी : श्रीरामपूर तालुक्यातील भोकर परिसरात राहणारा पोपट रघुनाथ वाकडे (वय 55) हा त्याच्या घरासमोर झाडलोट करीत होता. झाडलोट करीत असताना कच

जनगणनेच्या अचूकतेवर प्रश्नचिन्ह?नागरिकांकडून माहिती लपविण्याचे प्रकार, प्रगणकांवर दबाव असल्याची चर्चा
जुलमी सरकारची शेतकऱ्यांवर चालू असलेली सुलतानी वसुली त्वरित थांबवा – मा.आमदार बाळासाहेब मुरकुटे
नेप्ती फाट्यावर संतप्त शेतकरी ग्रामस्थांचा भारनियमन विरोधात रास्ता रोको

अहमदनगर/प्रतिनिधी : श्रीरामपूर तालुक्यातील भोकर परिसरात राहणारा पोपट रघुनाथ वाकडे (वय 55) हा त्याच्या घरासमोर झाडलोट करीत होता. झाडलोट करीत असताना कचरा पूजा नावाच्या महिलेच्या घरात उडाला. या कारणावरुन पूजा नावाच्या महिलेने पोपट रघुनाथ वाकडे याला शिवीगाळ करात धमकी दिली. तेव्हा पोपट हा पूजाला समजावून सांगत असताना त्याचा राग आल्याने पूजाने पोपटच्या हाताला कडकडून चावा घेतला. जखमी पोपट वाकडे यांच्या फिर्यादीवरुन पूजा (पूर्ण नाव माहीत नाही, रा. भोकर) हिच्याविरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलिसात भा.द.वि. कलम 324, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक पोलिस हवालदार पवार पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, महिलेने चावा घेतल्याची ही घटना भोकर व श्रीरामपूर परिसरात खळबळ उडवून गेली असून, चर्चेत आहे.

COMMENTS