Homeताज्या बातम्या

सीएमआयएस नोंदणीत श्रीगोंदा पोलिस जिल्ह्यात प्रथम

श्रीगोंदा: गुन्हेगार व आरोपींची अद्ययावत माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत

माहेगाव येथील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
मध्य प्रदेशातील भीषण अपघातात छत्रपती संभाजीनगरच्या चौघांचा मृत्यू; दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवरील घटना
राहाता आठवडेबाजारात मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट; एमएसएफ आणि पोलिसांच्या गस्तीची नागरिकांची मागणी

श्रीगोंदा: गुन्हेगार व आरोपींची अद्ययावत माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या क्रिमिनल मॉनिटरिंग इंटेलिजन्स सिस्टिम (सीएमआयएस) प्रणालीवर ७ हजार ७१९ आरोपींची नोंदणी पूर्ण केल्याने श्रीगोंदा पोलिस ठाण्याने अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविल्याचा दावा पोलिस प्रशासनाने केला आहे. महाराष्ट्र पोलिसांकडून आरोपींची माहिती डिजिटल स्वरूपात एकत्रित करण्यासाठी सीएमआयएस प्रणालीचा वापर केला जात आहे. या प्रणालीमध्ये आरोपीविरुद्ध दाखल गुन्हे, अटक, प्रतिबंधात्मक कारवाई, छायाचित्र तसेच अन्य संबंधित माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सराईत, फरार आणि पाहिजे आरोपींचा शोध घेण्यासह प्रतिबंधात्मक कारवाईचे नियोजन अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे. सीएमआयएसमध्ये तडीपार, फरार आणि पाहिजे आरोपींची माहिती, प्रतिबंधात्मक कारवाईचा इतिहास, गस्तीसाठी आवश्यक माहिती तसेच ‘टू प्लस’ यादीची नोंद केली जात आहे. आपल्या हद्दीत राहून इतर ठिकाणी गुन्हे करणारे तसेच बाहेरून येऊन हद्दीत गुन्हे करणाऱ्या आरोपींचे वर्गीकरणही या प्रणालीद्वारे करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे विविध जिल्ह्यांतील गुन्हेगारीविषयक माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होऊन तपास, आरोपींचे वर्गीकरण आणि प्रतिबंधात्मक कारवाईला गती मिळण्याची अपेक्षा आहे. ही मोहीम पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि कर्जत विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुजितकुमार क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या देखरेखीखाली श्रीगोंदा पोलिस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांनी पूर्ण केली.

COMMENTS