Homeताज्या बातम्या

कोतूळ परिसरातील वीज प्रश्नांवर माकपचा मोर्चा; कार्यवाहीचे महावितरणकडून आश्वासन

अकोले: कोतूळ व परिसरातील वीज समस्यांकडे महावितरणचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप) वतीने मोर्चा काढण्यात आ

खा. अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्हा बँकेवर भाजपचा झेंडा; काँग्रेसचे वर्चस्व संपुष्टात!
गोदावरीतील रेती माफियांना मुदखेड पोलिसांचा जबर दणका; 1.01 कोटींचा मुद्देमाल जप्त
अर्धापूर येथे अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार; आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल

अकोले: कोतूळ व परिसरातील वीज समस्यांकडे महावितरणचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप) वतीने मोर्चा काढण्यात आला. कॉ. सदाशिव साबळे यांच्या नेतृत्वाखाली कोतूळ बसस्थानकापासून सुरू झालेला मोर्चा महावितरणच्या उपकेंद्रावर नेण्यात आला. परिसरातील विविध वीज समस्यांबाबत आंदोलकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. राजूर उपविभागीय कार्यालयाचे सहाय्यक अभियंता सोनवणे यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. यावेळी धामणगाव पाट येथे तीन महिन्यांत तीन नवीन रोहित्रे (ट्रान्सफॉर्मर) देण्यात येतील, नेसाई वस्तीला वीजपुरवठा करण्यात येईल, फोपसंडी-मुठेवाडी येथे तसेच फोपसंडी गावात आवश्यक ठिकाणी वीजेचे खांब उभारण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले. तसेच बोरी, फोपसंडी, पिंपळगाव खांड, धामणगाव पाट आणि कोतूळ परिसरातील झोळ पडलेल्या वीजतारा, जीर्ण व वाकलेले खांब यांचा सर्वेक्षण करून आवश्यक दुरुस्ती करण्यात येईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. या मागण्यांबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, ३० ऑगस्टपर्यंत आश्वासनांची अंमलबजावणी झाली नाही, तर महावितरण कार्यालयासमोर मुक्कामी सत्याग्रह करण्यात येईल, असा इशारा माकपचे जिल्हा सेक्रेटरी कॉ. सदाशिव साबळे यांनी दिला. या आंदोलनात कॉ. सदाशिव साबळे, भीमा डोके, रावजी पारधी, एकनाथ गिऱ्हे, किसन मधे, बाळू डोके, सोमनाथ पिचड, निवृत्ती वळे, नामदेव वळे, बाळासाहेब भोर, अजित चौधरी, नाथा जाधव, नामदेव भांगरे, राजाराम गंभीरे, बाळासाहेब मिंडे आदी सहभागी झाले.

COMMENTS