राहाता : राहाता येथे दर गुरुवारी भरणार्या आठवडे बाजारात मोबाईल चोरट्यांचा मोठा सुळसुळाट झाला आहे. तालुक्यातून खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या गर

राहाता : राहाता येथे दर गुरुवारी भरणार्या आठवडे बाजारात मोबाईल चोरट्यांचा मोठा सुळसुळाट झाला आहे. तालुक्यातून खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरटे खिशातून आणि पिशव्यांमधून मोबाईल लंपास करत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
गेल्या काही दिवसांत अनेक नागरिकांचे मौल्यवान मोबाईल चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. मोबाईल पुढील खिशात किंवा सुरक्षित पिशवीत ठेवलेला असतानाही चोरी होत असल्याने नागरिकांना मोठा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर व्यापारी आणि नागरिकांकडून बाजार परिसरात पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी केली जात आहे. तसेच राहाता नगरपालिकेने शहराच्या सुरक्षेसाठी स्थापन केलेल्या एमएसएफ (MSF) कर्मचाऱ्यांनी आठवडे बाजारात फिरून मोबाईल चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी आग्रही मागणी शहरवासीयांकडून होत आहे.

COMMENTS