Homeताज्या बातम्या

मध्य प्रदेशातील भीषण अपघातात छत्रपती संभाजीनगरच्या चौघांचा मृत्यू; दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवरील घटना

मंदसौर: मध्य प्रदेशातील मंदसौर येथे दिल्ली-मुंबई ८ लेन एक्सप्रेसवेवर एक भीषण अपघात झाला आहे. एका भरधाव वेगातील कारने समोर चाललेल्या ट्रकला पाठीमा

राम मंदिर देणगी गैरव्यवहारावरून संसदेत प्रचंड गदारोळ; खरगेंचा तपास यंत्रणांवर सवाल, रिजिजूंचा विरोधकांवर पलटवार
बीडच्या मिल्लिया गर्ल्स प्रायमरी स्कूलमध्ये अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त प्रेरणादायी कार्यक्रम; चित्रकला स्पर्धेत विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग
शेताच्या बांधाच्या वादातून दिव्यांग शेतकऱ्यास मारहाण; रेहेकुरी येथील घटनेत चौघांविरुद्ध कर्जत पोलिसांत गुन्हा दाखल
मंदसौर में दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे पर ट्रक में घुसी कार, महाराष्ट्र के  चार लोगों की

मंदसौर: मध्य प्रदेशातील मंदसौर येथे दिल्ली-मुंबई ८ लेन एक्सप्रेसवेवर एक भीषण अपघात झाला आहे. एका भरधाव वेगातील कारने समोर चाललेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अत्यंत भीषण अपघातात कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडला.

सीतामऊ पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त रेनॉल्ट ट्रायबर कारमधून एकूण सहा जण प्रवास करत होते. हे सर्व प्रवासी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असून ते दिल्लीच्या दिशेने जात होते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ही धडक इतकी जोरदार होती की कारचा पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघातानंतर कारमधील प्रवासी सुमारे एक तास आतमध्येच अडकून पडले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

COMMENTS