Homeताज्या बातम्या

दीड वर्षांनंतर कोतूळ-अहिल्यानगर बससेवा सुरू

अकोले: गेल्या दीड वर्षापासून बंद असलेली कोतूळ-अहिल्यानगर-पारनेर एसटी बससेवा पुन्हा सुरू झाल्याने कोतूळ, ब्राह्मणवाडा, बोटा, आळेफाटा तसेच मुळा परि

तामसा परिसरात गुटखा विक्रीचा सुळसुळाट; बंदी केवळ कागदावर? प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
नांदेडच्या नूतन जिल्हा पोलीस अधीक्षकपदी निलभ रोहन; पदभार स्वीकारला
ई-२० पेट्रोलचे दर ८५ रुपये करा किंवा निर्णय मागे घ्या; अरविंद केजरीवाल यांचा पंतप्रधान निवासस्थानावर मोर्चा!

अकोले: गेल्या दीड वर्षापासून बंद असलेली कोतूळ-अहिल्यानगर-पारनेर एसटी बससेवा पुन्हा सुरू झाल्याने कोतूळ, ब्राह्मणवाडा, बोटा, आळेफाटा तसेच मुळा परिसरातील प्रवासी आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रवासी संघटना आणि नागरिकांनी केलेल्या मागणीनंतर पारनेर आगाराने ही सेवा पुन्हा सुरू केली. कोतूळ मुक्कामी असलेली ही बस सकाळी सहा वाजता कोतूळ येथून सुटते. ब्राह्मणवाडा, बोटा, आळेफाटा, टाकळी ढोकेश्वर मार्गे सकाळी दहा वाजता अहिल्यानगरला पोहोचते. परतीच्या प्रवासात ही बस अहिल्यानगर येथून सायंकाळी चार वाजता सुटते. आळेफाटा येथे सायंकाळी साडेसहा वाजता पोहोचल्यानंतर बोटा, ब्राह्मणवाडा मार्गे रात्री आठ वाजता कोतूळ येथे मुक्कामी पोहोचते. जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी सकाळी जाण्यासाठी तसेच सायंकाळी परतण्यासाठी ही बस कोतूळ, ब्राह्मणवाडा आणि मुळा परिसरातील नागरिकांसाठी सोयीची ठरणार आहे. तसेच कोतूळ येथून ब्राह्मणवाडा, बोटा आणि आळेफाटा येथे शिक्षणासाठी जाणाऱ्या शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही या बससेवेचा लाभ होणार आहे. बससेवा पुन्हा सुरू झाल्याने कोतूळ येथे प्रवाशांच्या वतीने बसचे स्वागत करण्यात आले. दीड वर्षापासून बंद असलेली सेवा पुन्हा सुरू झाल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. परिसरातील प्रवाशांनी या बससेवेचा नियमित लाभ घ्यावा, असे आवाहन प्रवासी संघटनेचे सोमनाथ लेंभे, सरपंच भास्कर लोहकरे, उपसरपंच संजय देशमुख, प्रल्हाद देशमुख, चंद्रकांत घाटकर, रमेश भुजबळ, गोरख देशमुख आणि दत्तात्रय जाधव यांनी केले.

COMMENTS