Homeताज्या बातम्या

गणेशनगर कॅम्पसला ‘डॉ. त्रिंबकराव पुरनाळे’ यांचे नाव

शेवगाव: कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाच्या गणेशनगर येथील कॅम्पसचे ‘डॉ. त्रिंबकराव पुरनाळे कॅम्पस’ असे नामकरण शुक्रवारी (ता. ७) करण्यात ये

झुंबरबाई घोलप यांचे निधन
संतोष पेढेकर यांची भारतीय सैन्यात निवड
कर्जत तालुक्यातील राशीनमध्ये वादळी वाऱ्यामुळे अनधिकृत होर्डिंग कोसळून २४ वर्षीय तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू; दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Kakade

शेवगाव: कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाच्या गणेशनगर येथील कॅम्पसचे ‘डॉ. त्रिंबकराव पुरनाळे कॅम्पस’ असे नामकरण शुक्रवारी (ता. ७) करण्यात येणार आहे. याच दिवशी शेवगाव-पाथर्डी तालुकास्तरीय ‘युवाशक्ती क्रिकेट करंडक’ क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन होणार असून, या दुहेरी कार्यक्रमामुळे तालुक्यात उत्साहाचे वातावरण आहे. महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आमदार विवेक कोल्हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे विश्वस्त पृथ्वीसिंह काकडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. ग्रामीण भागातील युवा खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने ७ ते ११ ऑगस्टदरम्यान ‘युवाशक्ती क्रिकेट करंडक’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला ३१ हजार रुपये, उपविजेत्या संघाला २१ हजार रुपये, तृतीय क्रमांकाच्या संघाला १५ हजार रुपये, तर चौथ्या क्रमांकाच्या संघाला ११ हजार रुपये रोख पारितोषिक व चषक देण्यात येणार आहे. प्रत्येक सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूला ‘सामनावीर’ पुरस्काराने गौरविण्यात येणार असून, स्पर्धेतील सर्व सामने यूट्यूबवर थेट प्रक्षेपित करण्यात येणार आहेत. नामकरण सोहळा व क्रिकेट स्पर्धेस तालुक्यातील नागरिक, क्रीडाप्रेमी आणि युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विश्वस्त पृथ्वीसिंह काकडे व संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

चौकट असे आहे स्पर्धेचे वेळापत्रक ७ ऑगस्ट : एक गाव–एक संघ (हाफ) ८ ऑगस्ट : खुली ग्रामीण (हाफ) ९ ऑगस्ट : शेवगाव–पाथर्डी तालुका (हाफ) १० ऑगस्ट : खुली (हाफ) ११ ऑगस्ट : उपांत्य व अंतिम सामने आणि पारितोषिक वितरण

COMMENTS