राष्ट्रवादी पक्षात युवकांना सन्मानासह काम करण्याची संधी -आ. संग्राम जगताप

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादी पक्षात युवकांना सन्मानासह काम करण्याची संधी -आ. संग्राम जगताप

अहमदनगर (प्रतिनिधी)-  ऑल इंडिया राहुल गांधी काँग्रेस कमिटीचे राज्य कार्यकारणी सदस्य अर्जुन चव्हाण व मानव संरक्षण समितीचे युवक जिल्हाध्यक्ष सलीम शे

Ahmednagar : सावेडीत चक्क रिक्षातून आली मिस इंडिया उपविजेती मान्या सिंह (Video)
सावेडी उपनगर भागातील श्रीराम चौक ते पुणे बस सेवेचा शुभारंभ
विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात करिअर करण्याच्या विविध संधी उपलब्ध आहे : योगेश गलांडे

अहमदनगर (प्रतिनिधी)- 

ऑल इंडिया राहुल गांधी काँग्रेस कमिटीचे राज्य कार्यकारणी सदस्य अर्जुन चव्हाण व मानव संरक्षण समितीचे युवक जिल्हाध्यक्ष सलीम शेख यांनी युवा कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी कार्यकर्त्यांचे स्वागत करुन त्यांचा सत्कार केला. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे वैभव ढाकणे, माजी नगरसेवक संभाजी पवार, विशाल अण्णा बेलपवार, संतोष ढाकणे, मोहन गुंजाळ, सागर गुंजाळ, दिपक लिपाणे, ओंमकार घोलप, मतीन ठाकरे, मंगेश मोकळ, विजय सुंबे, मळू गाडळकर, अनिकेत लोंढे, कृष्णा भागानगरे, अकिब शेख, सागर चवंडके, विजय नामदे, अजिंक्य भिंगारदिवे, प्रकाश बठेजा, युवराज बुंदेले, मिथुन दामले आदी उपस्थित होते.

 आमदार संग्राम जगताप म्हणाले की, राष्ट्रवादी पक्षात युवकांना सन्मानासह काम करण्याची संधी मिळत असल्याने युवावर्ग राष्ट्रवादीशी जोडला जात आहे. समाजातील प्रश्‍न सोडविण्यासाठी राष्ट्रवादीचा नेहमीच पुढाकार राहिला असून, विकासासाठी राष्ट्रवादी कटिबध्दपणे कार्य करीत आहे. प्रश्‍न मार्गी लागत असल्याने पक्षात काम करताना कार्यकर्ते व पदाधिकार्यांमध्ये एक प्रकारे आत्मविश्‍वास निर्माण झाला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी इमरान सय्यद, प्रभाकर पवार, सदाफ पटेल, इलियास शेख, नंदू चव्हाण, जय चव्हाण आदी युवा कार्यकर्त्यांनी देखील राष्ट्रवादीत प्रवेश केला. अर्जुन चव्हाण व सलीम शेख यांनी राष्ट्रवादी पक्ष वाढीसाठी व सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून कार्य करणार असल्याचे सांगितले.    

COMMENTS