Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठवाड्यात ५०० रुपयांच्या नोटांचा तुटवडा : अंबादास दानवे

छ. संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्यात सध्या ५०० रुपयांच्या नोटांची कमतरता जाणवत असून, त्याचा फटका नागरिकांसह शेतकऱ्यांनाही बसत आ

डॉलरच्या तुलनेत रुपयाची 95.75 विक्रमी घसरण
रिझर्व्ह बँक आज जाहीर करणार पतधोरण
शैक्षणिक कर्ज मंजूर करूनही वितरण टाळल्याने महाराष्ट्र ग्रामीण बँकेला ग्राहक आयोगाचा दणकाविद्यार्थ्यास 2.78 लाखांचे कर्ज वाटपासह 10 हजारांची नुकसान भरपाई देण्याचे निर्देश

छ. संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्यात सध्या ५०० रुपयांच्या नोटांची कमतरता जाणवत असून, त्याचा फटका नागरिकांसह शेतकऱ्यांनाही बसत आहे. बँकांमधून रोख रक्कम काढताना अनेक अडचणी निर्माण होत असल्याने ऐन लग्नसराईच्या काळात आणि खरीप हंगामाच्या तयारीदरम्यान व्यवहारांमध्ये अडथळे येत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे.

सध्या विवाह सोहळ्यांचा हंगाम सुरू असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोख रकमेची आवश्यकता भासत आहे. कापड खरेदी, भोजन व्यवस्था, मंगल कार्यालये तसेच इतर व्यवहारांमध्ये रोख पैशांची मागणी अधिक असते. मात्र बँकांमध्ये ५०० रुपयांच्या नोटांचा पुरवठा कमी झाल्याने अनेकांना आर्थिक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे, ग्रामीण भागात खरीप हंगामापूर्वीची शेती मशागत सुरू झाली आहे. बी-बियाणे, खते आणि इतर शेतीसाहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांना रोख रकमेची गरज भासत असते. ग्रामीण अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात रोख व्यवहारांवर आधारित असल्यामुळे या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना अंबादास दानवे यांनी सांगितले की, मराठवाड्यातील अनेक बँकांमध्ये ५०० रुपयांच्या नोटांचा गंभीर तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांना आवश्यक ती रोख रक्कम मिळण्यात अडचणी येत आहेत. लग्नसराई आणि शेतीपूर्व कामांचा विचार करून भारतीय रिझर्व्ह बँकेने तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती सुरळीत करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

COMMENTS