व्याजापोटी सावकाराने नेल्या शेळ्या: आठवड्यात सावकारीचा तिसरा गुन्हा दाखल

Homeशहरंअहमदनगर

व्याजापोटी सावकाराने नेल्या शेळ्या: आठवड्यात सावकारीचा तिसरा गुन्हा दाखल

जामखेड प्रतिनिधी शहरासह ग्रामीण भागात खाजगी सावकारी जोरात चालू आहे.  जामखेड पोलीस स्टेशनला एका आठवड्यात सावकारांच्या विरोधात तीन गुन्हे दाखल

कर्जतमधील ६ दुकाने सील नगरपंचायतची धडक कारवाई ; व्यवसायिक संतप्त
कुत्रा हुकला, पण बालकाचा जीव गेला
ऊस वाहतूक करणार्‍या वाहनांना रिफ्लेक्टिव्ह टेप गरजेचा : महेश भोजने

जामखेड प्रतिनिधी

शहरासह ग्रामीण भागात खाजगी सावकारी जोरात चालू आहे.  जामखेड पोलीस स्टेशनला एका आठवड्यात सावकारांच्या विरोधात तीन गुन्हे दाखल झाले आहेत.

पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहिती अशी की जामखेड तालुक्यातील बांधखडक येथील झाडू तयार करणाऱ्या  सुनील लक्ष्मण अडागळे (वय ३४) यांना आरोपी सोमीनाथ बाजीराव वनवे व सोपान बाजीराव वनवे यांनी २०,००० रुपये ५ % व्याजाने दिले होते. त्या पैश्याच्या व्याजापोटी ५०,०००  रुपये देऊनही सावकाराचे पुन्हा सुनील अडागळे यांच्याकडे १५०००  रुपये राहिले आहेत असे म्हणून पैशाचा तगादा लावला. 

दि २९ सप्टेंबर रोजी घरासमोर बांधलेल्या २ शेळ्या आरोपी सोमीनाथ बाजीराव वनवे याने बळजबरीने सोडून नेल्या . आहे सदरच्या शेळ्या फिर्यादीची पत्नी सावकाराकडे आणण्यासाठी गेली असता. यातील दुसरा आरोपी सोपान बाजीराव वनवे म्हणाला की, माझे पैसे आत्ताच्या आत्ता दे व तुझ्या शेळ्या घेऊन जा. असे म्हणून शिवीगाळ व दमदाटी करून चापटीने मारहाण केली. 

तेव्हा सुनील लक्ष्मण अडागळे तेथे जाऊन आपल्या पत्नीला घरी घेऊन गेला आहे. आरोपी क्र.१ हा फिर्यादीचे घरासमोर येऊन म्हणाला  की, मी गावात लोकांना साखर वाटली आहे माझे कोणी काही वाकडे करू शकत नाही. असे म्हणून फिर्यादी व त्यांचे कुटुंबियांना शिवीगाळ केली. 

यावरून सुनील लक्ष्मण अडागळे यांचे फिर्यादीवरून आरोपी सोमीनाथ बाजीराव वनवे. सोपान बाजीराव वनवे यांचे विरोधात महाराष्ट्र सावकारी अधिनियम कायदा कलम ३९सह विविध कलमान्वये  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक एस. व्ही. शेंडे हे करत आहेत.

COMMENTS