शेवगाव : भारतीय संस्कृतीत गाय ही ‘गोमाता’ मानली जात असून तिचे संरक्षण व संगोपन करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. गोसेवा हीच खरी समाजसेवा असून यामधूनच संस्कार व संवेदनशीलता जपली जाते, असे प्रतिपादन हिंदू संमेलनाचे प्रमुख वक्ते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्वप्रचारक व राष्ट्रीय कार्यकर्ते सुनील देवधर यांनी केले. शेवगाव येथील गोसेवक तथा शिवसेना युवासेना जिल्हाध्यक्ष साईनाथ आधाट हे मोठ्या प्रमाणावर देशी गायींचे संगोपन करून समाजापुढे आदर्श निर्माण करत आहेत. अत्यंत निष्ठेने व जिव्हाळ्याने ते गोसेवा करत असून त्यांच्या या कार्यातून समाजात सकारात्मक संदेश जात असल्याचे देवधर यांनी सांगितले. सध्याच्या काळात गोसंवर्धनाचे महत्त्व अधिक वाढले असून अशा कार्यकर्त्यांची समाजाला नितांत गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. साईनाथ आधाट यांनी गोसेवेबरोबरच समाजप्रबोधनाचे कार्यही हाती घेतले असून त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना ‘आदर्श गोपालक’ म्हणून सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांचा शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. मागील काही दिवसापूर्वी शनि मारुती मंदिराच्या पाठीमागे सुरू असलेल्या अनधिकृत कत्तलखान्यांचा मुद्दा प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात साईनाथ आधाट यांचा महत्त्वपूर्ण पुढाकार राहिला. गोवंश रक्षणाची तळमळ ठेवत त्यांनी संबंधित यंत्रणांकडे सातत्याने पाठपुरावा केला. “गोमातेचे रक्षण म्हणजे संस्कृतीचे संरक्षण” ही भूमिका त्यांनी ठामपणे मांडत प्रशासनाला जागृत केले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच पोलिस व प्रशासनाने तातडीने कारवाई करत बेकायदेशीर कत्तलखाने उद्ध्वस्त केले. या धाडसी भूमिकेमुळे समाजात सकारात्मक संदेश पसरला आहे. साईनाथ आधाट यांचा सन्मान हा शेवगावसाठी अभिमानाची बाब ठरत असून त्यांच्या कार्यामुळे अनेक युवकांना प्रेरणा मिळत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

शेवगाव : भारतीय संस्कृतीत गाय ही ‘गोमाता’ मानली जात असून तिचे संरक्षण व संगोपन करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. गोसेवा हीच खरी समाजसेवा असून यामधूनच संस्कार व संवेदनशीलता जपली जाते, असे प्रतिपादन हिंदू संमेलनाचे प्रमुख वक्ते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्वप्रचारक व राष्ट्रीय कार्यकर्ते सुनील देवधर यांनी केले.
शेवगाव येथील गोसेवक तथा शिवसेना युवासेना जिल्हाध्यक्ष साईनाथ आधाट हे मोठ्या प्रमाणावर देशी गायींचे संगोपन करून समाजापुढे आदर्श निर्माण करत आहेत. अत्यंत निष्ठेने व जिव्हाळ्याने ते गोसेवा करत असून त्यांच्या या कार्यातून समाजात सकारात्मक संदेश जात असल्याचे देवधर यांनी सांगितले. सध्याच्या काळात गोसंवर्धनाचे महत्त्व अधिक वाढले असून अशा कार्यकर्त्यांची समाजाला नितांत गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
साईनाथ आधाट यांनी गोसेवेबरोबरच समाजप्रबोधनाचे कार्यही हाती घेतले असून त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना ‘आदर्श गोपालक’ म्हणून सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांचा शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
मागील काही दिवसापूर्वी शनि मारुती मंदिराच्या पाठीमागे सुरू असलेल्या अनधिकृत कत्तलखान्यांचा मुद्दा प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात साईनाथ आधाट यांचा महत्त्वपूर्ण पुढाकार राहिला. गोवंश रक्षणाची तळमळ ठेवत त्यांनी संबंधित यंत्रणांकडे सातत्याने पाठपुरावा केला. “गोमातेचे रक्षण म्हणजे संस्कृतीचे संरक्षण” ही भूमिका त्यांनी ठामपणे मांडत प्रशासनाला जागृत केले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच पोलिस व प्रशासनाने तातडीने कारवाई करत बेकायदेशीर कत्तलखाने उद्ध्वस्त केले. या धाडसी भूमिकेमुळे समाजात सकारात्मक संदेश पसरला आहे.
साईनाथ आधाट यांचा सन्मान हा शेवगावसाठी अभिमानाची बाब ठरत असून त्यांच्या कार्यामुळे अनेक युवकांना प्रेरणा मिळत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

COMMENTS