Homeताज्या बातम्या

ED-CBI सारख्या यंत्रणा तुमच्याकडे असताना माझी भीती कशाची? शिरसाट भेटीवरून अभिजित दिपकेंचा भाजपवर थेट निशाणा

छत्रपती संभाजीनगर: विद्यार्थी आंदोलनातून पुढे आलेले आणि CJP पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सध्याच्या राजकीय घडामोडी, त्यांच्यावरील आरोप तसेच

टीना अंबानींना ईडी पुन्हा समन्स देणार
प.बंगाल सरकारची सर्वोच्च न्यायालयात कॅव्हिएट दाखल
मी चुकीचे काही केलेले नाही… चौकशीत ईडीला पूर्ण सहकार्य करणार…
Abhijeet Dipke Slams BJP Over Sanjay Shirsat Meeting | Maharashtra Politics

छत्रपती संभाजीनगर: विद्यार्थी आंदोलनातून पुढे आलेले आणि CJP पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सध्याच्या राजकीय घडामोडी, त्यांच्यावरील आरोप तसेच विविध वादांबाबत सविस्तर भूमिका स्पष्ट केली. शिवसेना नेते संजय शिरसाट यांच्यासोबत झालेल्या भेटीवरून निर्माण झालेल्या चर्चांना त्यांनी पूर्णविराम देत ती केवळ सदिच्छा भेट असल्याचे सांगितले. त्याचबरोबर भाजपवर टीका करत, अंमलबजावणी संचालनालय, केंद्रीय अन्वेषण विभाग आणि इतर सर्व यंत्रणा तुमच्याकडे असताना एका 30 वर्षांच्या तरुणाची भीती का वाटते? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

मंत्री संजय शिरसाट यांच्या भेटीबाबत सुरू असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना दिपके म्हणाले की, शिरसाट हे कोणत्याही राजकीय चर्चेसाठी आले नव्हते. त्यांनी केवळ वैयक्तिक स्तरावर भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. युवकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडल्याबद्दल त्यांनी कौतुक व्यक्त केले. या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढण्याचे कारण नसल्याचे दिपके यांनी स्पष्ट केले.

भाजपवर टीका करताना दिपके म्हणाले की, तपास यंत्रणा, सरकारी अधिकार आणि संपूर्ण यंत्रणा सत्ताधाऱ्यांकडे आहे. आमच्याकडे अशा कोणत्याही साधनांचा आधार नाही. लोक केवळ वैयक्तिक नात्याने किंवा चांगल्या कामासाठी शुभेच्छा देण्यासाठी भेटतात. त्यामुळे एका तरुण कार्यकर्त्याबाबत इतकी अस्वस्थता दाखवण्याची गरज नाही, असा टोला त्यांनी लगावला.

COMMENTS