Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खरात भक्तांनी आम्हाला अध्यात्म शिकवू नये : दडीयाल

कोपरगाव : खोटे आरोप करून जनतेची दिशाभूल करणाऱ्या तसेच भोंदू प्रवृत्तीशी छुपी साथ ठेवणाऱ्या वसुली एजंटांना आता नागरिकांनी ओळखले आहे. खरात भक्तांनी आम्हाला अध्यात्म आणि शांततेचे धडे देऊ नयेत, असा घणाघाती आरोप दडीयाल यांनी केला. आमच्या नेतृत्वावर खोटे आरोप करून राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न होत असल्याचाही त्यांनी आरोप केला. धार्मिक आणि पवित्र ठिकाणीही राजकीय गोंधळ निर्माण करण्यासाठी काही विरोधक स्वतःचे लोक पुढे करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. खोट्या अफवा पसरवणाऱ्यांचा दुटप्पीपणा आणि त्यामागील वास्तव लवकरच पुराव्यानिशी उघड करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. विरोधकांच्या चुकीच्या भूमिकांना विरोध करणे म्हणजे कोणालाही धमकावणे नव्हे, असे स्पष्ट करत आमच्या नेत्यांनी संयम राखण्याचे मार्गदर्शन केले असल्याचे दडीयाल यांनी सांगितले. ‘उलटा चोर कोतवाल को डांटे’ अशी भूमिका विरोधकांनी घेतल्याचा आरोप करत त्यांनी विरोधकांना पातळी सोडून राजकारण करू नये, असा इशाराही दिला. धार्मिक ठिकाणी प्रथम गोंधळ घालून नंतर सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न काही जण करत असल्याचा आरोप करत त्यांनी अर्धसत्य आणि चुकीची माहिती पसरवून जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला जात असल्याचे म्हटले. मात्र सुज्ञ नागरिक आता अशा भुलथापांना बळी पडणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्वामी समर्थांच्या सभामंडपाला विरोध दर्शविल्याच्या घटनेचा निषेध करत धार्मिक स्थळांच्या विकासकामांत अडथळे निर्माण करणे योग्य नसल्याचे त्यांनी नमूद केले. जनतेने सत्य परिस्थिती ओळखून अशा प्रवृत्तींना वेळीच आवर घालावा, असे आवाहनही त्यांनी केले.

रविवारी करंजीत भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन
रविवारी करंजीत भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन
भव्य शोभायात्रेने संत बंकटस्वामी महाराजांच्या 82 व्या पुण्यतिथी सोहळ्याची थाटात सुरुवात; निनगुर गावात काय वाजत गाजत… बंकटस्वामींचा सोहळा गाजत..! जयघोषाने परिसर दुमदुमला

कोपरगाव : खोटे आरोप करून जनतेची दिशाभूल करणाऱ्या तसेच भोंदू प्रवृत्तीशी छुपी साथ ठेवणाऱ्या वसुली एजंटांना आता नागरिकांनी ओळखले आहे. खरात भक्तांनी आम्हाला अध्यात्म आणि शांततेचे धडे देऊ नयेत, असा घणाघाती आरोप दडीयाल यांनी केला. आमच्या नेतृत्वावर खोटे आरोप करून राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न होत असल्याचाही त्यांनी आरोप केला.

धार्मिक आणि पवित्र ठिकाणीही राजकीय गोंधळ निर्माण करण्यासाठी काही विरोधक स्वतःचे लोक पुढे करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. खोट्या अफवा पसरवणाऱ्यांचा दुटप्पीपणा आणि त्यामागील वास्तव लवकरच पुराव्यानिशी उघड करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

विरोधकांच्या चुकीच्या भूमिकांना विरोध करणे म्हणजे कोणालाही धमकावणे नव्हे, असे स्पष्ट करत आमच्या नेत्यांनी संयम राखण्याचे मार्गदर्शन केले असल्याचे दडीयाल यांनी सांगितले. ‘उलटा चोर कोतवाल को डांटे’ अशी भूमिका विरोधकांनी घेतल्याचा आरोप करत त्यांनी विरोधकांना पातळी सोडून राजकारण करू नये, असा इशाराही दिला.

धार्मिक ठिकाणी प्रथम गोंधळ घालून नंतर सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न काही जण करत असल्याचा आरोप करत त्यांनी अर्धसत्य आणि चुकीची माहिती पसरवून जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला जात असल्याचे म्हटले. मात्र सुज्ञ नागरिक आता अशा भुलथापांना बळी पडणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

स्वामी समर्थांच्या सभामंडपाला विरोध दर्शविल्याच्या घटनेचा निषेध करत धार्मिक स्थळांच्या विकासकामांत अडथळे निर्माण करणे योग्य नसल्याचे त्यांनी नमूद केले. जनतेने सत्य परिस्थिती ओळखून अशा प्रवृत्तींना वेळीच आवर घालावा, असे आवाहनही त्यांनी केले.

COMMENTS