Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अन्नसुरक्षा अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे निवेदन

शेवगाव : जिल्ह्यात कार्यरत असलेल्या अन्नसुरक्षा अधिकारी राजेश बडे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्या विरोधात तातडीने कारवाई

एफडीए चा अहवाल वास्तव की दिशाभूल करणारा ?
कुंडलवाडी शहरात भेसळयुक्त विक्रीचा प्रकार; नागरिकांमध्ये संताप
पुणे दुर्घटनेनंतर FDA ची भिवंडीत धडक कारवाई; तब्बल ६ टन मिथेनॉल जप्त। लोकमंथन News२४
नगरमध्ये बनावट चीजप्रकरणी उत्पादक कंपनीस अन्न प्रशासनाची नोटीस… - Marathi  News | Ahilyanagar Food Safety Action Against Fake Cheese Ocd 94 - Latest  Maharashtra News at Loksatta.com

शेवगाव : जिल्ह्यात कार्यरत असलेल्या अन्नसुरक्षा अधिकारी राजेश बडे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्या विरोधात तातडीने कारवाई करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे.

 निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शेवगाव येथे नुकत्याच झालेल्या दूध तपासणी प्रकरणात प्रयोगशाळेचा अंतिम अहवाल प्रलंबित असताना अन्नसुरक्षा अधिकारी बडे यांनी घाईघाईने पत्रकार परिषद घेऊन संबंधित दूधामध्ये भेसळ आढळल्याचे जाहीर वक्तव्य केले. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संभ्रम व भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित दूध डेअरी चालकांवर अन्यायकारक परिणाम झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

संघटनेच्या मते, ही बाब अत्यंत गंभीर असून अन्न सुरक्षा व मानक अधिनियम तसेच शासकीय कार्यपद्धतीचा भंग करणारी आहे. अधिकृत अहवाल येण्यापूर्वी अशा प्रकारचे वक्तव्य करणे हे नियमबाह्य व बेजबाबदार कृत्य असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काही मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये राजेश बडे यांच्या वर्तनाची सखोल चौकशी करावी, दोषी आढळल्यास शासकीय कर्मचारी अधिनियमांतर्गत कठोर कारवाई करावी तसेच आवश्यक असल्यास संबंधित प्रकरणात फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशा मागण्यांचा समावेश आहे. दरम्यान, या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.

भेसळ करणाऱ्यांना अभय?

जिल्ह्यात दूधासह विविध अन्नपदार्थांतील वाढत्या भेसळीमुळे ग्राहक व शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. अन्न भेसळ विभाग प्रभावी कारवाई करण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बाळासाहेब फटांगडे यांनी केला. शेतकरी शुद्ध उत्पादन देत असतानाही काही व्यापारी नफ्यासाठी दूध, पेढे, फळे व इतर खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करून ग्राहकांची सर्रास फसवणूक करत आहेत, असे त्यांनी नमूद केले. भेसळ करणाऱ्यांना संबंधित अधिकाऱ्यांकडून अभय मिळत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

COMMENTS