Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. हेडगेवार शिक्षणशास्त्र महाविद्यालयात; वार्षिक पारितोषिक व दीक्षांत समारंभ उत्साहात

अहिल्यानगर : विद्या प्रतिष्ठान (महाराष्ट्र) संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय, अहिल्यानगर येथे ६१ वा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा व बी.एड. दीक्षांत समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठानचे अध्यक्ष दादाराम एकनाथ ढवाण होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून कोषाध्यक्ष प्राचार्य प्रा. डॉ. रावसाहेब पवार उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. प्राचार्य प्रा. डॉ. अमरनाथ शांताराम कुमावत यांनी प्रास्ताविकातून महाविद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेत उपस्थितांचे स्वागत केले.  परीक्षा विभाग प्रमुख उपप्राचार्य प्रा. डॉ. गोकुळदास दत्तात्रय लोखंडे यांनी अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. दीक्षाविधी महाविद्यालयीन प्रमुख प्रा. डॉ. शर्मिला भाऊसाहेब पारधे-देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल बी.एड. प्रथम वर्ष विद्यार्थी शिक्षिका धनश्री अवसरे व विद्यार्थी शिक्षक अथर्व काळे यांनी सादर केला.  पीएच.डी. प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव प्रा. डॉ. अविनाश ओंकारराव भांडारकर यांच्या निवेदनातून करण्यात आला. तसेच आर्थिक साक्षरता कोर्सविषयीची माहिती प्रा. डॉ. प्रदीप आबासाहेब शेळके यांनी दिली. पारितोषिक वितरण सोहळ्यात बी.एड. क्रीडा, सांस्कृतिक तसेच एम.एड. शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे निवेदन प्रा. विलास देवराव पांढरे यांनी केले.   मनोगत सत्रात प्रा.डॉ.अविनाश भांडारकर यांनी प्राध्यापक प्रतिनिधी म्हणून विचार मांडले. विद्यार्थ्यांच्या वतीने साक्षी लोंढे, निकिता मोकाटे, ईशा साळवे, सोनाली दारुंटे तसेच विद्यार्थी शिक्षक प्रतिनिधी कुलदीप कुलकर्णी यांनी भावना व्यक्त केल्या. प्रमुख अतिथी प्रा. डॉ. रावसाहेब पवार यांनी विद्यार्थ्यांना भविष्यकालीन आव्हानांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात दादाराम ढवाण यांनी शिक्षणातील गुणवत्ता, मूल्याधिष्ठित शिक्षण व संशोधनाचे महत्त्व अधोरेखित केले.  यावेळी ग्रंथपाल प्रा.रुपाली ओक, प्रा. डॉ. आश्लेषा भांडारकर, प्रा. डॉ. दादासाहेब काजळे, प्रा. मनीषा  वर्पे -सहाणे, प्रा. अनिता लवांडे, प्रा. विशाल जाधव, प्रा. सुनील वाकचौरे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रतिनिधी मंजुषा बोरुडे (बी. एड. द्वितीय वर्ष) व कल्याणी चौधरी (बी. एड. प्रथम वर्ष) तसेच शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.एड. प्रथम वर्ष विद्यार्थी शिक्षिका रुद्राक्षे शितल व साक्षी शिंदे यांनी केले. शेवटी उपप्राचार्य प्रा. डॉ. गोकुळदास लोखंडे यांनी आभार मानले.

अहिल्यानगर जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा वाढला; श्रीरामपूर, शिर्डी कोपरगावमध्ये तापमानाने ओलांडली चाळीशी!
वैद्यकीय क्षेत्र बळकट करण्यासाठी नवे पाऊल : मुख्यमंत्री फडणवीस; वैद्यकीय सेवेसाठी जायकाकडून 3 हजार 708 कोटींची वित्तीय सहाय्यता
सहकारभारतीच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी हजारे

अहिल्यानगर : विद्या प्रतिष्ठान (महाराष्ट्र) संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय, अहिल्यानगर येथे ६१ वा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा व बी.एड. दीक्षांत समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठानचे अध्यक्ष दादाराम एकनाथ ढवाण होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून कोषाध्यक्ष प्राचार्य प्रा. डॉ. रावसाहेब पवार उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. प्राचार्य प्रा. डॉ. अमरनाथ शांताराम कुमावत यांनी प्रास्ताविकातून महाविद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेत उपस्थितांचे स्वागत केले.

 परीक्षा विभाग प्रमुख उपप्राचार्य प्रा. डॉ. गोकुळदास दत्तात्रय लोखंडे यांनी अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. दीक्षाविधी महाविद्यालयीन प्रमुख प्रा. डॉ. शर्मिला भाऊसाहेब पारधे-देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल बी.एड. प्रथम वर्ष विद्यार्थी शिक्षिका धनश्री अवसरे व विद्यार्थी शिक्षक अथर्व काळे यांनी सादर केला.

 पीएच.डी. प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव प्रा. डॉ. अविनाश ओंकारराव भांडारकर यांच्या निवेदनातून करण्यात आला. तसेच आर्थिक साक्षरता कोर्सविषयीची माहिती प्रा. डॉ. प्रदीप आबासाहेब शेळके यांनी दिली. पारितोषिक वितरण सोहळ्यात बी.एड. क्रीडा, सांस्कृतिक तसेच एम.एड. शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे निवेदन प्रा. विलास देवराव पांढरे यांनी केले.

  मनोगत सत्रात प्रा.डॉ.अविनाश भांडारकर यांनी प्राध्यापक प्रतिनिधी म्हणून विचार मांडले. विद्यार्थ्यांच्या वतीने साक्षी लोंढे, निकिता मोकाटे, ईशा साळवे, सोनाली दारुंटे तसेच विद्यार्थी शिक्षक प्रतिनिधी कुलदीप कुलकर्णी यांनी भावना व्यक्त केल्या. प्रमुख अतिथी प्रा. डॉ. रावसाहेब पवार यांनी विद्यार्थ्यांना भविष्यकालीन आव्हानांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात दादाराम ढवाण यांनी शिक्षणातील गुणवत्ता, मूल्याधिष्ठित शिक्षण व संशोधनाचे महत्त्व अधोरेखित केले.

 यावेळी ग्रंथपाल प्रा.रुपाली ओक, प्रा. डॉ. आश्लेषा भांडारकर, प्रा. डॉ. दादासाहेब काजळे, प्रा. मनीषा  वर्पे -सहाणे, प्रा. अनिता लवांडे, प्रा. विशाल जाधव, प्रा. सुनील वाकचौरे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रतिनिधी मंजुषा बोरुडे (बी. एड. द्वितीय वर्ष) व कल्याणी चौधरी (बी. एड. प्रथम वर्ष) तसेच शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.एड. प्रथम वर्ष विद्यार्थी शिक्षिका रुद्राक्षे शितल व साक्षी शिंदे यांनी केले. शेवटी उपप्राचार्य प्रा. डॉ. गोकुळदास लोखंडे यांनी आभार मानले.

COMMENTS