'देशविरोधी' आणि 'संविधानविरोधी' असे संबोधण्यात आल्याच्या प्रश्नावर दिपके यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. ज्यांनी आयुष्यभर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच

‘देशविरोधी’ आणि ‘संविधानविरोधी’ असे संबोधण्यात आल्याच्या प्रश्नावर दिपके यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. ज्यांनी आयुष्यभर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना विरोध केला, त्यांनी संविधानाबाबत आम्हाला उपदेश देऊ नये, असे ते म्हणाले. संविधानाचा आदर आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठीच विद्यार्थी आंदोलन उभे राहिले असल्याचा दावा त्यांनी केला.
दिल्लीत विरोधात दाखल झालेल्या तक्रारीबाबत बोलताना दिपके म्हणाले की, तक्रारीत कोणतेही ठोस तथ्य नाही. केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी हा प्रकार करण्यात आला आहे. अशा तक्रारींमुळे कामावर कोणताही परिणाम होणार नाही. लोकशाही पद्धतीने आणि संविधानाच्या चौकटीत राहून होणाऱ्या प्रत्येक आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. शांततामय मार्गाने आवाज उठवणे हा लोकशाहीचा मूलभूत अधिकार असल्याचे त्यांनी नमूद केले.
सीजेपीची पुढील रणनीती लवकरच होणार स्पष्ट जंतरमंतरवरील आंदोलनानंतर पक्षाची पुढील भूमिका काय असेल, यावर बोलताना दिपके यांनी सांगीतले की, पुढील दोन दिवसांत पक्षाची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत आंदोलनातून मिळालेला अनुभव, आगामी संघटनात्मक विस्तार आणि देशभरात पक्ष बळकट करण्याची दिशा यावर चर्चा होईल. आगामी काळात युवकांशी व्यापक संपर्क साधून संघटना विस्तारावर भर दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

COMMENTS