Homeताज्या बातम्या

पाटोदा पोलिसांकडून 14.80 लाखांचा गुटखा व प्रतिबंधित अन्नपदार्थ नष्ट

पाटोदा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला सुमारे 14 लाख 80 हजार 123 रुपयांचा गुटखा व अन्य प्रतिबंधित अन्नपदार्थ

आरोग्याची खेळ करणार्यांना अभय नकोभेसळयुक्त अन्नपदार्थ विक्रेत्यांवर कठोर कारवाईची मनसेचे सोमेश्वर कदम यांची मागणी
चहाच्या पॅकेटवर उत्पादन दिनांकच नाहीश्रीगोंद्यात  ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
हजारो शिधापत्रिकाधारक धान्यापासून वंचित राहण्याची भीतीमे-जूनचे रेशन एकाचवेळी वितरित करण्याचे आव्हान; अनेक दुकानांत अद्याप धान्यच नाही  



पाटोदा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला सुमारे 14 लाख 80 हजार 123 रुपयांचा गुटखा व अन्य प्रतिबंधित अन्नपदार्थ न्यायालयाच्या आदेशानुसार नियमानुसार नष्ट करण्यात आला. प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या विक्री व वाहतुकीविरोधात पोलीस प्रशासनाने केलेली ही महत्त्वाची कारवाई मानली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा क्रमांक 385/2024, 40/2025, 243/2025 आणि 263/2025 या चार गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या गुटखा व प्रतिबंधित अन्नपदार्थाच्या मुद्देमालाची विल्हेवाट लावण्याचे आदेश मा. न्यायालय, पाटोदा यांनी दिले होते. न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करत संबंधित मुद्देमाल नियमानुसार नष्ट करण्यात आला. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी अ. भ. गाढे व पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी पोलीस हवालदार नैराळे, पोलीस हवालदार कावळे, दोन पंच तसेच पत्रकार कोल्हे उपस्थित होते. जप्त करण्यात आलेल्या प्रतिबंधित अन्नपदार्थांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणार्‍या गुटखा व अन्य प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री, साठवणूक आणि वाहतूक करणार्‍यांविरोधात पोलीस व अन्न सुरक्षा विभागाकडून यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

COMMENTS