Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शहरटाकळी येथे महामानवास मानवंदना  

शहरटाकळी: शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथे विविध ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले, महामान

देवळा (बु.) येथे रिपाइं नामफलकाचे उद्घाटन; युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांची प्रमुख उपस्थिती
डॉ. आंबेडकरांनी बहिष्कृतांच्या जीवनात आत्मसन्मानाचे बीज पेरले – डॉ. सतीश साळुंके
नवगण राजुरी : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना उपसरपंचांसह ग्रामस्थांचे अभिवादन!

शहरटाकळी: शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथे विविध ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले,
 महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती चे औचित्य साधून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व धर्म समभाव, न्याय,समता,बंधुता,भारतीय नागरिकांची कर्तव्ये,हक्क सर्वांना मिळवून दिले, समान न्याय मिळावा यासाठी त्यांनी आपले आयुष्य खर्च केले व त्यानुसार संविधानात सर्वसमावेशक कलमे अंतर्भूत केली. शिका,संघटित व्हा,संघर्ष करा हा मंत्र डॉ आंबेडकर सर्वांना दिला अशा या महामानवाला शहरटाकळी येथेे अभिवादन करण्यात आले, या वेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले .
यावेळी ग्रा.प. सदस्य युवा नेते संभाजी गवळी, सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब राऊत , माजी सरपंच अण्णासाहेब शिंदे, भगवानराव खरमाळे ,निकाळजे, आत्माराम कुंडकर, संदीप राऊत, शिवाजीराव खराडे, रामचंद्र गिरम, डॉ. महेश भालेराव,मेजर रमेश नरवडे, संतोष कोल्हे, माननील कोल्हे, समीर कोल्हे, मोहन कोल्हे,  संदीप कोल्हे, पंढरीनाथ कोल्हे,आसाराम शिंदे, राजेंद्र बोरुडे, संभाजी कोल्हे, कडुबाळ कोल्हे, गणेश कावले, गौरव चव्हाण आदीसह मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस हे. कॉ. परशुराम नाकाडे व सहकाऱ्यांनी चोक बंदोबस्त ठेवला.

COMMENTS