Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बुळे पठारमध्ये तीव्र पाणीटंचाई महिलांसह चिमुरड्यांची वणवण; एक हंड्यासाठी तीन किलोमीटरची पायपीट

देवळाली प्रवरा : कडक उन्हाच्या झळा तीव्र होत असताना राहुरी तालुक्यातील चिखलठाण येथील बुळे पठार गावाला पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भेडसावत आहे

‘एनएमएमएस’ परीक्षेत वेदिका सूर्यवंशी तालुक्यात प्रथम
‘कलेक्टर साहेब, ड्रममध्ये डिझेल द्या!’ नियम बदला आणि शेतकऱ्यांची खोळंबलेली मशागतीची कामे वाचवा; रामनाथ राजपुरे यांची मागणी!
मंथन परीक्षेत श्रीगोंदा माध्यमिक विद्यालयाचे यश  

देवळाली प्रवरा : कडक उन्हाच्या झळा तीव्र होत असताना राहुरी तालुक्यातील चिखलठाण येथील बुळे पठार गावाला पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भेडसावत आहे. गावातील महिला व लहान मुलांना केवळ एक हंडा पाण्यासाठी तीन किलोमीटरची पायपीट करावी लागत असल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत.
 बुळे पठार हे आदिवासीबहुल महसुली गाव असून येथे ११ कुटुंबांतील सुमारे १६० नागरिक वास्तव्यास आहेत. गावात सुमारे ५०० च्या आसपास शेळ्या, मेंढ्या व गायींची संख्या आहे. या गावाला चिखलठाण ग्रामपंचायतीमार्फत झिऱ्याच्या दरीतून पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र, उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे हा पाणीस्रोत आटल्याने गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. परिणामी ग्रामस्थांना तीन किलोमीटर अंतरावरील लेंभेवाडी येथील तळ्यावरून घाटमार्गे पायी जाऊन पाणी आणावे लागत आहे. यामुळे विशेषतः महिलांवर व लहान मुलांवर मोठा ताण पडत आहे.

प्रशासनाकडून दाद नाही
पाणीटंचाईबाबत पंधरा दिवसांपूर्वीच प्रशासनाला माहिती देऊन आटलेल्या विहिरीचे फोटो सादर केले होते. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, अशी नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी अक्षरशः वणवण करावी लागत असल्याचे रघुनाथ बुळे यांनी सांगितले.

टँकर सुरू करण्याची मागणी
दरम्यान, पिण्याच्या पाण्यासाठी तातडीने टँकर सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी न लागल्यास आंदोलनाचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

तीन किलोमीटरवरून आणतात पाणी
या गावाला चिखलठाण ग्रामपंचायतीमार्फत झिऱ्याच्या दरीतून पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र, उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे हा पाणीस्रोत आटल्याने गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. परिणामी ग्रामस्थांना तीन किलोमीटर अंतरावरील लेंभेवाडी येथील तळ्यावरून घाटमार्गे पायी जाऊन पाणी आणावे लागत आहे.

पाणीटंचाईबाबत गटविकास अधिकाऱ्यांकडून प्रस्ताव आल्यानंतर संबंधित गावाची पाहणी करून टँकर सुरू करण्याबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येईल. – डॉ.अमित पवार, तहसीलदार, राहुरी

COMMENTS