Homeताज्या बातम्या

संत गोरोबा आश्रम विद्यालयात विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वाटप; अजित पवार जयंती सप्ताहानिमित्त उपक्रम

कुंडलवाडी: महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंती सप्ताहानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने विविध सामाजिक उपक

नांदेड जिल्हा परिषदेतील अनागोंदी कारभार; आरोग्य अन् शिक्षण विभागातील घोटाळ्यांवर ‘सीईओ’ महेश पाटलांचे मौन!
आदित्य कृषी महाविद्यालयाच्या कृषिदूतांकडून सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापनाबाबत शेतकर्‍यांना मार्गदर्शन
शिर्डीत ‘अन्नभेसळ’कडून हजारो किलो माल नष्ट; मिठाई व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ
शाळा सुरू झाल्यानंतरच होणार विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप Mumbai Marathi  News | Uniforms will be distributed to the students only after the  commencement of school | Latest Mumbai News at Lokmat.com

कुंडलवाडी: महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंती सप्ताहानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून कुंडलवाडी येथील संत गोरोबा काका निवासी आश्रम विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वाटप करण्यात आले.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नांदेड जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील यांच्या पुढाकारातून हा उपक्रम पार पडला. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करून शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील, कुंडलवाडीचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय गिरी, नगरसेवक मारोती कोटलावार, राष्ट्रवादी काँग्रेसचे बिलोली तालुकाध्यक्ष रणजित पाटील हिवराळे, श्रीनिवास नरवाडे, माणिक पाटील, निळकंठ दुडले, मिलिंद मांजरमकर, गंगाधर एच. बी. गायकवाड, माजी सरपंच प्रल्हाद निदाने, विलास शिंदे, सूर्यकांत आगळे, प्रशांत शिंदे, आनंदराव कवडेकर, दिनेश गादगे, एकनाथ शिंदे, बाला शिंदे, बाला मिर्झापूरे आणि माधव कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी, विद्यालयाचे शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात गरजू विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वितरण करण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणात सातत्य ठेवून उज्ज्वल भवितव्य घडवावे, असा संदेश देत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

COMMENTS