Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बोअरवेलमध्ये पडलेल्या सागरला वाचवण्यात अपयश

कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील दुर्घटना

कर्जत/प्रतिनिधी ः कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील काकासाहेब ज्ञानदेव सुद्रिक यांच्या शेतातील बोअरवेलमध्ये पडलेल्या सागर बुद्धा बारेला या 5 वर्षाच

रावसाहेब खेवरे यांची अ‍ॅड लांडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट
गटनोंदणी फुटली …मुंबईचा हस्तक्षेप झाला सुरू
शिर्डी साईबांबाच्या नवीन वर्षाच्या दर्शनासाठी ग्रामीण भागातून दिंड्याचा ओघ वाढला

कर्जत/प्रतिनिधी ः कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील काकासाहेब ज्ञानदेव सुद्रिक यांच्या शेतातील बोअरवेलमध्ये पडलेल्या सागर बुद्धा बारेला या 5 वर्षाच्या बालकाला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात आली. मात्र त्याला वाचवण्यात यश आले नाही. मंगळवारी पहाटे अडीच वाजता त्याला बाहेर काढले त्यावेळी तो मृत झाला होता.
मध्यप्रदेशातील ऊसतोड कामगाराचा मुलगा सोमवारी सायंकाळी शेतात खेळत असताना बोअरवेलमध्ये पडला होता. त्याला वाचवण्यासाठी सलग 11 तास अथक प्रयत्न करण्यात आले. जेसीबी व पोकलेनच्या सहाय्याने बोअरवेलच्या बाजूचे उत्खनन करण्यात आले. सुमारे 15 फूटाच्या आसपास उत्खनन केल्यानंतर सागर हाती लागला. मात्र त्यापूर्वीच त्याने प्राण सोडले होते. 108 रुग्णवाहिका, ऑक्सिजन सुविधा, अग्निशमन गाड्या अशा सुविधा घटनास्थळी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. रात्री उशिरा एनडीआरएफचे पथकही मदत कार्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. सर्व प्रशासकीय यंत्रणा या कामात व्यस्त होत्या. मात्र बालकाला वाचवण्यात यश मिळाले नाही. घटनेची माहिती मिळताच भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांनी आ. प्रा. राम शिंदे यांना याबाबत कळवले. आ. शिंदे यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना सर्व सुविधा पुरविण्याबाबत सूचना केल्या. मुलाचा जीव वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे त्यांनी सूचित केले. मात्र 10 फुटानंतर खडक कठीण लागल्याने उत्खनन करण्यात अडथळे येत होते. ग्रामस्थ व प्रशासनाने केलेले शर्थीचे प्रयत्न सागरला वाचविण्यात अपयशी ठरले.

COMMENTS