Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भारतात काम करण्यासाठी एक उत्तम ठिकाण म्हणून व्हायट्रिस सगल तिसऱ्या वर्षी प्रमाणित

नाशिक- मायलान लेबॉरेटरिज लिमिटेडला (व्हायट्रिसची कंपनी) सलग तिसर्यांदा काम करण्यासाठी भारतातील ग्रेट प्लेस टू वर्क  सर्टिफिकेशन या प्रतिष्ठित मान

मामी फेस्टिव्हलसाठी प्रियंका चोप्रा मुंबईत दाखल
न्यूझीलंडला ‘गिल’ वादळाचा तडाखा
महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदे करुन आरोपींना लवकरात लवकर फाशी व्हावी

नाशिक- मायलान लेबॉरेटरिज लिमिटेडला (व्हायट्रिसची कंपनी) सलग तिसर्यांदा काम करण्यासाठी भारतातील ग्रेट प्लेस टू वर्क  सर्टिफिकेशन या प्रतिष्ठित मान्यतेने गौरवण्यात आले आहे. ही मान्यता सकारात्मक, आकर्षक आणि सर्वसमावेशक कार्यस्थळ संस्कृतीला प्रोत्साहन देण्यास व्हायट्रिसच्या वचनबद्धतेचा दाखला आहे जी आपल्या कर्मचार्यांचे कल्याण आणि व्यावसायिक विकासाला महत्त्व देते. आपल्या कर्मचार्यांना मौल्यवान वाटावे, पाठिंब्याची खात्री वाटावी आणि आपले म्हणणे ऐकून घेतले जाते असे वाटण्यासाठी व्हायट्रिसची जी वचनबद्धता आहे त्याची पुष्टी हे प्रमाणन करते.ग्रेट प्लेस टू वर्क हे कार्यस्थळ संस्कृतीवरील जागतिक प्राधिकरण आहे 1992 पासून त्यांनी जागतिक स्तरावर 100 दशलक्षपेक्षा जास्त कर्मचार्यांचे सर्वेक्षण केले आहे आणि त्या सखोल अंतर्दृष्टीचा उपयोग एक उत्तम कार्यस्थळ कसे तयार होते हे परिभाषित करण्यासाठी केला: ते म्हणजे विश्वास. त्यांचे कर्मचारी सर्वेक्षण प्लॅटफॉर्म नेतृत्वाला अभिप्राय, तिअल-टाइम रिपोर्टिंग आणि लोकांना धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आवश्यक असलेली माहिती व ज्ञान देऊन सक्षम करते! ग्रेट प्लेस टू वर्क नॅशनल ट्रस्ट इंडेक्स© कर्मचारी सर्वेक्षण, ज्यांनी व्हायट्रिसचे विश्वासार्हता, आदर, निःपक्षता, अभिमान आणि सहयोग या पाच वर्गांमध्ये मूल्यमापन केले त्यांच्यानुसार, 89% उत्तर देणार्यांानी व्हायट्रिस इंडिया ग्रेट प्लेस टू वर्क असल्याचे नमूद केले!प्रमाणनाविषयी बोलताना उद्धव गंजू, एचआर प्रमुख – ग्लोबल ऑपरेशन्स, इंडिया, इमर्जिंग एशिया अँड अॅेक्सेस मार्केट्स म्हणाले, “2022 पासून सलग तिसऱ्या वर्षी भारतात ग्रेट प्लेस टू वर्क प्रमाणपत्र मिळवण्याचा आम्हाला सन्मानित वाटते आहे. हे यश आमच्या समर्पित टीम सदस्यांच्या सामुहिक प्रयत्नांची साक्ष आहे. आम्ही एक कर्मचारी-केंद्रित संस्कृती स्थापन केली आहे जी आमच्या कर्मचार्यांमच्या सक्षमीकरणाला आणि विकासाला चालना देते. व्हायट्रिसमध्ये आम्ही अशी संस्कृती विकसित करीत आहोत जी कामगिरी, प्रतिबद्धता आणि समावेशकता यांना प्राधान्य देते. आम्ही आमच्या सहकार्यांअना प्रामाणिक राहून इतरांच्या जीवनावर अर्थपूर्ण प्रभाव पाडण्यासाठी त्यांच्या अनोख्या अनुभवांचा, दृष्टीकोनांचा आणि कौशल्यांचा फायदा करुन देण्यासाठी प्रोत्साहित करतो.”

COMMENTS