Homeताज्या बातम्या

लाखो रुपये खर्चून विकत आणलेल्या बसेस धुळखात! एका वर्षात विद्यापीठाची बस धावलीच नाही, खाजगी कंत्राटदाराला पोसण्याचा प्रकार?

नांदेड: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने शासनाच्या निधीतून खरेदी केलेल्या स्वतःच्या बसेस गेल्या वर्षभरापासून वापराविना उभ्या असताना, वा

गेवराई पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; ७.५० लाखांचा ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त
भूमी सर्वेक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावर दखल; प्रशांत गुरुनाथ फोडसे यांना ’महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२६’
मुक्त पत्रकारितेच्या शिरपेचात मानाचा सातवा तुरा
Massive corruption at Swami Ramanand Tirtha Marathwada University  allegation of senate member | स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात  मोठा अपहार, सिनेट सदस्याचा आरोप

नांदेड: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने शासनाच्या निधीतून खरेदी केलेल्या स्वतःच्या बसेस गेल्या वर्षभरापासून वापराविना उभ्या असताना, वाहतूक सेवेसाठी खासगी कंत्राट देण्याची तयारी सुरू असल्याची जोरदार चर्चा विद्यापीठाच्या वर्तुळात रंगली आहे. या प्रस्तावित निर्णयामुळे आर्थिक पारदर्शकता, सार्वजनिक निधीचा योग्य वापर आणि प्रशासकीय निर्णय प्रक्रियेबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

काही सिनेट सदस्यांच्या म्हणण्यानुसार, विद्यापीठाच्या स्वतःच्या मालकीच्या बसेस उपलब्ध असताना खासगी वाहतूक कंत्राटदाराची नियुक्ती करण्याची नेमकी आवश्यकता काय, याचे स्पष्ट उत्तर प्रशासनाने द्यावे. विद्यार्थ्यांकडून वाहतूक सुविधा सुरू करण्याची मागणी सातत्याने होत असतानाही विद्यापीठाच्या बसेस वर्षापासून कार्यान्वित करण्यात आल्या नाहीत, याबाबतही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

यासंदर्भात व्यवस्थापन परिषदेतील एका सदस्याच्या पुढाकाराने खासगी वाहतूक कंत्राट देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची चर्चा असून, त्यामागील निकष आणि निर्णय प्रक्रिया सार्वजनिक करण्याची मागणी होत आहे. काही सिनेट सदस्यांनी या प्रक्रियेत आर्थिक अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त करत संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे. मात्र, या आरोपांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

विद्यापीठात विविध विकासकामे आणि सेवा कंत्राटांच्या वाटपात पारदर्शकता राखली जात आहे का, तसेच निर्णय गुणवत्तेच्या निकषांवर घेतले जात आहेत की अन्य कोणत्या कारणांवर, याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सार्वजनिक निधीतून खरेदी केलेल्या बसेस वर्षभर वापराविना ठेवण्यामागील कारणे, त्यांची सद्यस्थिती आणि त्यांना सेवेत का आणले गेले नाही, याचा खुलासा कुलगुरू आणि प्रशासनाने करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाबाबत विद्यापीठ प्रशासन, कुलगुरू आणि संबंधित अधिकार्‍यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे वस्तुस्थिती स्पष्ट करण्यासाठी प्रशासनाने तात्काळ खुलासा करावा आणि आवश्यक असल्यास स्वतंत्र चौकशी करून सर्व माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी विद्यापीठ वर्तुळातून होत आहे.

COMMENTS