Homeताज्या बातम्या

आदित्य कृषी महाविद्यालयाच्या कृषिदूतांकडून सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापनाबाबत शेतकर्‍यांना मार्गदर्शन

बीड: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत आदित्य शिक्षण संस्था संचलित आदित्य कृषी महाविद्यालयाच्या कृषिदूतांनी ग्रामीण कृषी कार्या

सौ. के. एस. के. महाविद्यालयात ‘पाऊस गाणी’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; विद्यार्थ्यांच्या बहारदार सादरीकरणाने सभागृह दुमदुमले
कर्जतमध्ये सराफाला भरदिवसा लुटले; दोन महिलांनी चांदीचे दागिने केले लंपास
८० मोजा आणि पाणी प्या! किनवटमध्ये दुधाच्या दरवाढीसोबत भेसळीचा ’धंदा’ जोरात; अन्न व औषध प्रशासन कुंभकर्णी झोपेत?
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी (Vasantrao Naik Marathwada  Agriculture University, Parbhani) – मराठी विश्वकोश

बीड: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत आदित्य शिक्षण संस्था संचलित आदित्य कृषी महाविद्यालयाच्या कृषिदूतांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव व कृषी औद्योगिक उपक्रम सन २०२६-२७ अंतर्गत गावातील शेतकर्‍यांना सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

कृषिदूत आदित्य कुर्‍हे, स्वप्नील शिंदे, आनंद शिंदे, रुधिर आघाव, सचिन वनवे, स्वप्नील काळे, रोहन आकोसकर, विकास पिंपळे, बालाजी पवार व यशपाल ओव्हाळ यांनी शेतकर्‍यांना सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर, त्याचे योग्य प्रमाण, पिकांच्या वाढीमध्ये त्यांचे महत्त्व तसेच पिकांच्या उत्पादनवाढीवर होणारे परिणाम याबद्दल मार्गदर्शन केले. पिकांना आवश्यक असलेल्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता ओळखणे, त्यावर उपाययोजना करणे आणि योग्य वेळी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर केल्यास पिकांची वाढ, गुणवत्ता व उत्पादनात सुधारणा कशी होते, याबाबत कृषिदूतांनी प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली.

या उपक्रमासाठी महाविद्यालयाच्या मृदाशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. एस. जी. बोरडकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी आदित्य शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा डॉ. आदिती सारडा, प्राचार्य श्यामजी भुतडा, कार्यक्रम समन्वयक डॉ. ब्रह्मदेव मुंडे, कार्यक्रम अधिकारी डॉ. धनंजय सातपुते, ग्राम सहवास अधिकारी डॉ. एस. एस. एडके व प्राध्यापकवर्गाचे सहकार्य लाभले. कृषिदूतांच्या या उपक्रमामुळे शेतकर्‍यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती मिळून उत्पादनवाढीस मदत होणार आहे.

COMMENTS