Homeताज्या बातम्या

गाझा पट्टीतला संघर्ष संपण्याची चिन्हे; बोर्ड ऑफ पीसच्या मध्यस्थीने हमासचे निशस्त्रीकरण अन् इस्रायली सैन्याची माघार

वॉशिंग्टन / जेरुसलेम: गाझा पट्टीत गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेला आणि भीषण युद्धाचे रूप घेतलेला संघर्ष अखेर संपुष्टात येण्याची ऐतिहासिक चिन्हे

मध्य रेल्वेचा आज मेगा ब्लॉक; माटुंगा ते मुलुंड आणि हार्बर लाईन्सवर लोकल सेवा प्रभावित
मुख्यमंत्री फडणवीस व मंत्री पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर; ७१ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग
पाकव्याप्त काश्मीरमध्ये हाहाकार! महागाईविरोधात रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांवर पाकिस्तानी लष्कराचा थेट गोळीबार; ४० ठार, हजारो जखमी
Trump Gaza Disarmament Agreement: गाझा पट्टीत होणार शांतता! हमासच्या  संपूर्ण नि:शस्त्रीकरणाचा ऐतिहासिक करार; डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा -  Navakal

वॉशिंग्टन / जेरुसलेम: गाझा पट्टीत गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेला आणि भीषण युद्धाचे रूप घेतलेला संघर्ष अखेर संपुष्टात येण्याची ऐतिहासिक चिन्हे निर्माण झाली आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेल्या ‘बोर्ड ऑफ पीस’ने (Board of Peace) गाझामधील हमाससह सर्व सशस्त्र गटांच्या संपूर्ण निशस्त्रीकरणाबाबत एक महत्वपूर्ण करार झाल्याची घोषणा केली आहे. या करारांतर्गत इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने गाझामधून माघार घेणार असून, या भागात नवीन पॅलेस्टिनी प्रशासनाची स्थापना केली जाणार आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे माहिती दिली की, त्यांच्या २०-कलमी गाझा शांतता योजनेतील हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. कतार, इजिप्त आणि तुर्की यांच्या मध्यस्थीने आणि ट्रम्प यांच्या टीमच्या अनेक महिन्यांच्या प्रयत्नांनंतर हमास व इतर सशस्त्र गटांनी आपली शस्त्रे जमा करण्यास सहमती दर्शवली आहे.

नवीन तंत्रशासित सरकार आणि सुरक्षा व्यवस्था:

कराराच्या आराखड्यानुसार, गाझाचा कारभार ‘नॅशनल कमिटी फॉर द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ गाझा’ (NCAG) या नवीन संस्थेकडे सोपवला जाईल. ही संस्था हमास आणि पॅलेस्टिनी प्राधिकरणापासून पूर्णपणे स्वतंत्र असेल आणि गाझामधील नागरी सेवा, कायदा व सुव्यवस्थेचे व्यवस्थापन करेल. इस्रायली सैन्य मागे हटल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्थिरीकरण दल (International Stabilization Force) आणि नवीन पॅलेस्टिनी पोलीस दल गाझाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळतील.

निशस्त्रीकरणाची प्रक्रिया कशी असणार?

गाझामधील निशस्त्रीकरण प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि टप्प्याटप्प्याने राबवली जाणार आहे:

  • पहिला टप्पा: हमासचे नागरी पोलीस आपली शस्त्रे नवीन पॅलेस्टिनी पोलिसांकडे सुपूर्द करतील.
  • दुसरा टप्पा: जड शस्त्रे सुरक्षित ठिकाणी साठवली जातील, तर शस्त्रांचे कारखाने आणि भुयारी बोगदे नष्ट केले जातील.
  • अंमलबजावणीचा कालावधी: अमेरिकन अधिकाऱ्यांच्या मते, हमासच्या निशस्त्रीकरणापासून ते इस्रायली सैन्य माघार आणि नवीन सुरक्षा यंत्रणा तैनात होईपर्यंतच्या या संपूर्ण प्रक्रियेला २०० ते ३५० दिवसांचा (सुमारे वर्षभराचा) कालावधी लागू शकतो.

‘बोर्ड ऑफ पीस’ म्हणजे काय?

ट्रम्प यांनी गाझा युद्ध संपवण्यासाठी आणि भविष्यात जागतिक स्तरावरील संघर्ष सोडवण्यासाठी ‘बोर्ड ऑफ पीस’ या आंतरराष्ट्रीय मंडळाची स्थापना केली आहे. या मंडळात सुमारे ६० हून अधिक देशांना आमंत्रित करण्यात आले असून, हे मंडळ नवीन पॅलेस्टिनी सरकारसोबत (NCAG) समन्वयाने काम करेल, जेणेकरून गाझामध्ये चिरस्थायी शांतता प्रस्थापित होईल आणि ७ ऑक्टोबरसारख्या हल्ल्यांची पुनरावृत्ती होणार नाही.

COMMENTS