Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चंद्रपुरात पारा ४५ अंशांवर; नंदुरबारमध्ये भररस्त्यात उन्हामुळे तांदळाचा ट्रक जळून खाक!

https://www.youtube.com/watch?v=udiWWrGRLPk राज्यात उन्हाचा कडाका आता असह्य होऊ लागला आहे. विदर्भात सूर्याने आग ओकायला सुरुवात केली असून चंद्रपु

देशातील पहिल्या फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्याचा शुभारंभ
वजीराबाद पोलिसाकडून गुन्हा नोंदविण्यासाठी टाळाटाळ
रामेश्‍वरच्या त्रिवेणी संगमावर तिघा भावांचा बुडून मृत्यू

राज्यात उन्हाचा कडाका आता असह्य होऊ लागला आहे. विदर्भात सूर्याने आग ओकायला सुरुवात केली असून चंद्रपुरात पारा थेट ४५ अंशांवर पोहोचला आहे. या भीषण उष्णतेचा परिणाम आता वाहनांवरही होऊ लागला असून, नंदुरबारमध्ये एका चालत्या ट्रकला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
विदर्भातील अकोला आणि चंद्रपूरमध्ये नागरिक उष्म्यामुळे हैराण झाले आहेत. याच उष्णतेच्या लाटेदरम्यान नंदुरबारमधील सुरत-नागपूर महामार्गावर ‘बर्निंग ट्रक’चा थरार पाहायला मिळाला. पानबरा गावाजवळ तांदळाने भरलेल्या एका ट्रकला अचानक भीषण आग लागली. बघता बघता काही क्षणातच संपूर्ण ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आणि लाखोंचा माल जळून खाक झाला.

COMMENTS