Homeताज्या बातम्या

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी माधवराव जवळगावकर आघाडीवर? भाजप प्रवेशाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

नांदेड: नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात

सौ. के. एस. के. महाविद्यालयात ’एम.ए. मराठी’ व ’ग्रामीण पत्रकारिता’ अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू !
कोपरगाव-निफाड परिसरातील बंधाऱ्यांच्या दुरुस्तीला मंजुरी; आ. विवेक कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश, ७.२९ कोटींचा निधी मंजूर
50% महागाई भत्ता वेतनात विलीन करा : कर्मचारी युनियन
Nanded Political News | काँग्रेसचे माजी आमदार माधवराव पाटील- जवळगावकर  यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा निराधार

नांदेड: नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. भाजपमध्ये त्यांच्या संभाव्य प्रवेशानंतर अध्यक्षपदाची धुरा त्यांच्याकडे सोपविली जाऊ शकते, अशी माहिती पक्षातील वरिष्ठ सूत्रांकडून मिळत असल्याचे बोलले जात आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलला स्पष्ट बहुमत मिळाले. या विजयामुळे अध्यक्षपदासाठी विविध नावांची चर्चा सुरू असली, तरी जवळगावकर यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. हिमायतनगर सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातून माधवराव जवळगावकर यांनी अत्यंत अटीतटीच्या लढतीत अवघ्या एका मताने विजय मिळविला. या निवडणुकीत शिवसेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी विशाल राठोड यांना उमेदवारी देत कडवे आव्हान उभे केले होते. आष्टीकर आणि जवळगावकर घराण्यांतील अनेक दशकांपासूनचा राजकीय संघर्ष या निवडणुकीतही कायम राहिल्याचे दिसून आले. राजकीय निरीक्षकांच्या मते, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जवळगावकर यांना शेतकरी विकास पॅनलमध्ये स्थान देऊन खासदार अशोकराव चव्हाण यांनी त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखविला आहे. यापूर्वीही त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील कठीण टप्प्यांवर खा. चव्हाण यांनी त्यांना संधी दिल्याची चर्चा आहे. दरम्यान, भाजपमध्ये माधवराव जवळगावकर यांच्या प्रवेशाची चर्चा वेगाने सुरू असून, त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविली जाऊ शकते, अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. मात्र, याबाबत अद्याप भाजप किंवा संबंधित नेत्यांकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

COMMENTS